अबोदनागो चव्हाण
जिल्हा प्रतिनीधी अमरावती…
दखल न्यूज भारत..
चिखलदरा -: चिखलदरा तालुक्यातील मौजा बामादेही शेतशिवारात सोमवारी दुपारी चार वाजता घडलेल्या भीषण घटनेत शंकर झोले भुसुम वय ४० हे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.
श्री.शंकर झोले भुसुम दुपारच्या सुमारास चार वाजता आपल्या शेतात गाय बैल आणण्यासाठी गेले असता,अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला.
अस्वलाच्या हल्ल्यात त्यांच्या गर्दन आणि कमरेवर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे प्राथमिक उपचार करुन पुढिल उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्परता दाखवत जखमी शेतकऱ्याला वाचवले.मौजा बामादेही परिसरात अस्वलांच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.ग्रामीण भागात वाढत्या वन्यप्राण्यांच्या हालचालींमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे आणि भितीचे वातावरण निर्माण होत आहे.



