Home Vidarbha पंचशील वार्डातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे दिले निवेदन…

पंचशील वार्डातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे दिले निवेदन…

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्यूज भारत

साकोली : येथील पंचशील वार्ड अजितदादा चौक येथील नागरिकांनी विविध मागण्याचे निवेदन नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना दिले. या निवेदनात रस्ता दुरुस्ती ,बंद असलेले लाईट चालू करणे, माणिकराव फुलबांदधे यांच्या घरासमोरील, प्रशांत राऊत यांच्या घरासमोरील व अतुल कॉन्व्हेन्ट समोरील रस्ते बनविण्यात यावे कारण येथील नागरिकांना रस्त्याने रात्री बेरात्री येजा करावे लागते.

      मागील काही दिवसापासून रस्त्याविषयी नगरपरिषदेला कळविले होते परंतु नगरपरिषदणे व कोणतेही कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. पावसाळा आला की या ठिकाणी पाणी साचतो व येजा करण्यास भीती वाटते कारण इथे सापांचा संचार व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या संचार चालू झालेला आहे.

       गेली कित्येक वर्षापासून येथील नागरिक त्रास सहन करत आहेत तसेच या भागात पथदिवे लावण्यात यावे कारण या ठिकाणी अंधार असल्याने मुलांना येजा करण्यास त्रास होतो तसेच रस्त्यांबद्दल तातडीने दखल घेण्यात यावे असे या निवेदनात नमूद केले आहे.

        निवेदन देतेवेळी व्यंकटेश येवले भाजपा साकोली /शेंदुरवाफा मंडळ अध्यक्ष ,जिल्हा सचिव किशोर पोगडे, माजी शहराध्यक्ष नितीन खेडीकर, शहर महामंत्री डाकराम कापगते,सुधा फुलबांधे ,मंदा हटवार, हीना राऊत ,उषा खूने ,लेसणा राऊत,रूपाली हाडगे ,लक्ष्मी उरकुडे व अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.