युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापुर अंजनगाव मार्गावरील निंभारी फाट्यासमोर आज 6 जूनला दुपारी 12 वाजताच्या सुमारास लग्न वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या क्रुझर व प्रवाशी ऑटोचा भिषण अपघात झाला.या अपघातात 14 जण गंभिर जखमी झाले असून बाकी किरकोळ जखमी झाले आहेत. क्रुझर क्र.एमएच 22 यु 3154, हि गाडी लग्न वऱ्हाड घेऊन दर्यापूर कडून अंजनगाव येथे जात होती.
तर प्रवाशी तीन चाकी ऑटो एम एच 27,ए एफ 3076 हा निंभारी वरुन दर्यापुर कडे जात असताना क्रूझरच्या वाहना समोरील आलेल्या ऑटोला वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटो व क्रुझर या दोन वाहनाची धडक झाली. या धडकेत लग्नाच्या वऱ्हाडाने भरलेले क्रुझर वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन तिन पलट्या घेत उलटले क्रुझर मधिल 12 जण हे गंभिर जखमी झाले तसेच ऑटो मधील ऑटो चालक व त्याचा सहकारीही गंभिररित्या जखमी असून सर्व 14 जणांना ग्रामिण रुग्णालय, अंजनगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र काहीना गंभिर स्वरूपाचा मार असल्याने त्यांना अचलपूर व अमरावती येथे रेफर करण्यात आले.
जखमीमध्ये नयना सिरसाट,आकांक्षा सिरसाट दर्यापूर,गौतम सदांशिव राजुरा,संतोष वानखडे वरखेड, दादाराव वानखडे कावसा,रंजना सिरसाट दर्यापूर,श्रुती भोजने दर्यापूर,पद्मा वानखडे, समिक्षा इंगळे,रिया राक्षसकर,अशोक सिरसाट,कैलास खडे रा.दर्यापूर हे गंभिर जखमी झाले.
ऑटो चालक प्रकाश परातमोल एकलारा,संजय वानखडे निंभारी हे गंभिर जखमी झालेत. घटनेची माहीती रहिमापुर पोलिस स्टेशनला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून सर्व जखमींना पोलिस,ग्रामस्थ व रुग्ण सेवकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना ग्रामिण रुग्णालय येथे पोहोचवन्यात आले,घटनेचा पुढील तपास चिंचोली पोलिस स्टेशनचे एएसआय गजानन वर्मा,पो.काॕ.संजय गायकवाड,भारती भुस्कट, नरेंद्र थोरात करीत आहे.



