नक्षलविरोधी कारवायामध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या १० पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली वेगवर्धीत पदोन्नती..

 

डॉ.जगदिश वेन्नम

  संपादक 

गडचिरोली :गडचिरोली जिल्हा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असल्याने येथे नक्षलविरोधी कारवाया नेहमी घडत असतात. जिल्ह्यात कार्यरत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना नक्षलविरोधी अभियानादरम्यान नेहमी आव्हानात्मक परिस्थीतींचा सामना करावा लागत असतो. अशाच आव्हानांना सामोरे जात असतांना अधिकारी / अंमलदार यांचे मनोबल उंचवावे यासाठी शासनाकडुन वेगवर्धीत पदोन्नती, राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, पोलीस महासंचालक पदक इ. प्रोत्साहन मिळण्याची संधी असते.

         याअनुषंगाने नक्षली कारवायांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील १० पोलीस उपनिरिक्षक यांना सहायक पोलीस निरीक्षक पदी वेगवर्धीत पदोन्नती आज दिनांक ०६/०६/२०२३ रोजी मा. पोलीस महासंचालक कार्यालयाकडुन जाहीर झालेली आहे.

       वेगवर्धीत पदोन्नती प्राप्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पोउपनि संगमेश्वर ईश्वरराव बिरादार, पोउपनि, सदाशिव नामदेव देशमुख, पोउपनि प्रशांत छोटुलाल बोरसे, पोउपनि, राहुल नामदेवराव देव्हडे, पोउपनि प्रेमकुमार लहू दांडेकर, पोउपनि कृष्णा राजेंद्र काटे, पोउपनि राहुल विठ्ठल आव्हाड, पोउपनि भास्कर सोपानराव कांबळे, पोउपनि समाधान किसनराव दौंड व पोउपनि किशोर बाप्पासाहेब शिंदे यांचा समावेश आहे.

       वेगवर्धीत पदोन्नती मिळाल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी सर्व अधिकाऱ्यांचे मन:पुर्वक अभिनंदन केले व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी व भावी कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात.