शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर तालुक्यातील नेरी येथील वार्ड क्रमांक ३ मधील रहीवासी विकास मोतीराम ढोले वय ४५ वर्षं यांचेवर दि ४ में रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास शंकरपुर शिवारातील हिवरा येथे अंगावर विज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला.
विकास ढोले मेंढपाळाचा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.स्वतः च्या व सोबत असणाऱ्या सहकार्याच्या मेंढ्या घेऊन शंकरपुर,सांठगावं हिवरा या परिसरातील शेतकऱ्यांकडे बसका होता.
मेंढ्या चारत असतांना दि ४ में ला सायंकाळी ५.३० वाजता चे सुमारास वादळी वारा व विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली.
दरम्यान सोबत्याला पुढे पाठवुन मेंढ्याचा कडप घेवून बसक्याचे ठिकाणी जात असताना त्याचे अंगावर विज कोसळली आणि विकासचा जागेवरच मृत्यू झाला.
सायंकाळचे सात वाजेपर्यंत आला नाही म्हणून सोबत्याने त्याचा शोध घेतला असता शेत शिवारात तो मृतावस्थेत आढळून आला.त्याच्या मृत्यू प्रकरणाची आणि घटनाक्रमाची घरच्यांना माहिती देण्यात आली
चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.दि ५ ला येथील स्मशानभूमीत त्याचे पार्थिवावर अनेकांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आला.
त्याच्या मृत्यु मागे त्याचे परिवारात पत्नी, मुलगा, मुलगी, आई,भाऊ,बहीणी व बराच मोठा आप्त परिवार आहे
अचानक झालेल्या त्याच्या मृत्यू मुळे नेरी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



