ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- शिव क्रीडा मंडळ सालमारा यांचे वतीने भव्य व्हॉलिबॉल क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन सोहळा दि. ०६/०२ /२०२६ ला संपन्न झाला.या दिनांक पासून ते अंतिम सामन्यापर्यंत सालमारा येथील पटांगणावर खेळविल्या जात आहे.
या व्हाॅलिबाल स्पर्धेतील प्रथम विजेता संघास प्रथम पुरस्कार रोख ३१००० /- रु.,द्वितीय विजेता संघास रोख २१००० /- रु.,तर तृतीय विजेता संघास रोख पुरस्कार १५००० /- रु. पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या व्हाॅलिबाल स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी प्रवेश फी ७०१ /- रु.,तरऑब्जेक्शन फी २००१ /- रु.,ठेवण्यात आलेली आहे.सदरील व्हाॅलिबाल स्पर्धेचे उद्घाटन पुरुषोत्तम शेंडे सर जी.प .शाळा सालमारा , तर सह उद्घाटक ऋषी सहारे पत्रकार तर अध्यक्ष म्हणून हंसराज वाकडे पोपा हे होते.
प्रमुख पाहुणे कल्पना नारनवरे, लिलाधर कांबळे, संपत कुमरे, मुक्ता वाकडे, रेखा कांबळे, सरिता घरत, सरस्वता रंधये संचालन गंगाधर कुमारे तर आभार माधव नारनवरे यांनी मानले. व्हाॅलिबाल क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी शिव क्रिडा मंडळाचे अध्यक्ष, सचिव, सभासद व इतर कार्यकर्ते उपस्थित राहून परिश्रम घेत आहेत.



