शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकांतर्गत मौजा नेरी येथील ग्रामपंचायत पटांगणावर आज दिनांक ४-१२-२०२५ ला महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या वतीने एका प्रेमीजोडप्यांचा विवाह लावून देण्यांत आला.
वर निखील विजय डांगे वय २६ वर्ष रा नेरी ता चिमुर जिल्हा चंद्रपूर जात बौद्ध येथील रहिवासी असून वधु उज्वला हरिदास सिंगाडे वय १९ वर्षे रा.चिचोली पो हरडोली ता ब्रम्हपुरी जि.चंद्रपुर जात कुणबी या नवोदित उभयतांनी महात्मा गांधी तंटामुक्त समीती नेरी यांच्या कडे विवाह लावून देण्यासाठी रितसर अर्ज केला की आम्हा दोघा उभयतांमध्ये गेल्या एक वर्षापासून ओळख निर्माण झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यामुळे दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले, दोघांनीही विवाह लावून देण्यासाठी तमुसकडे अर्ज केला अर्जाची सविस्तर पडताळणी करून विवाहास पात्र ठरल्याने महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पिंटु खाटीक यांच्या पुढाकारातून बौद्ध विवाह पद्धतीनुसार विवाह लावून देण्यांत आला.
यावेळी तमुस अध्यक्ष पिंटु खाटीक,सरपंच सौ रेखाताई पिसे, उपसरपंच चंद्रभान कामडी,समीती सदस्य सौ गंगाबाई कामडी,सौ सत्यभामा कामडी,सौ अर्चना डांगे, रामचंद्र डांगे,मानीक नगराळे,यशवंत कामडी,संजय नागदेवते,रुस्तमखा पठाण,मिलींद जांभुळकर, विनोद चौधरी सर्व समीती सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वधुवरांना शुभाशीर्वाद देण्यात आला.



