हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत गुरुवर्य बापूसाहेब देहुकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न… — श्री गुरूंच्या आशीर्वादाने या लक्ष्मी नरसिंहाच्या पावनभूमीत मोठा सोहळा झाला :- श्री गुरु सोहम महाराज देहूकर…

  बाळासाहेब सुतार

 नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

                गुरुवर्य श्री बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त श्री गरु सोहम महाराज देहुकर यांची काल्याची कीर्तन सेवा झाली. या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धनजी पाटील, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे ,देहू संस्थान, आळंदी संस्थान, पंढरपूर संस्थान यांनी आपली उपस्थिती लावली,तर सर्व भागातून आजी-माजी सरपंच पदाधिकारी कार्यकर्ते व भाविक भक्त या सर्वांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.

              या निमित्त माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत आसताना म्हणाले की, श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांची हजारो कीर्तन प्रवचन संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आहेत. त्यांच्या प्रत्येक कीर्तनातील एक अध्याय जर बघितला तर पुढच्या दहा पिढ्या उभ्या करण्याचे काम एका अध्यायामध्ये करण्याची ताकद ही गुरुवर्य बापूसाहेब देहुकर महाराज यांच्या मध्येच आहे. माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांचे यावेळी उद्गार.

           माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे बोलत आसताना म्हणाले की गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर यांचा 65 व्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त सांगतो की लक्ष्मी नरसिंह देवस्थानचा विकास हा कोणताच कमी पडू देणार नाही. कोणत्याच कामाला निधी कमी पडून दिलेली नाही. नरसिंहाचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे कोणत्याच गोष्टीची कमतरता आलेली नाही. देवस्थान विकास आराखड्यातील सर्वच कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. आई व वडील यांची काळजी घेणे हे गरजेचे आहे सेवा करण्यासाठी कुणीही कमी पडू नका जीवनामध्ये आई-वडील निघून जातात तेव्हाच त्याची किंमत कळते म्हणूनच त्यांचा विसर पडू देऊ नका माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त बोलत होते.

             गुरुवर्य बापूसाहेब देहुकर मळवली यांच्या कुटुंबामध्ये दुःखद झालेल्या घटनेबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, कल्याणराव काळे देहुकर संस्थान, आळंदी संस्थान, पंढरपूर संस्थान यांनीही याबद्दल दुःख व्यक्त केले.

           या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त गुरुवर्य बापूसाहेब देहुकर महाराज, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, कल्याणराव काळे, देहू संस्थान पंढरपूर संस्थान ,आळंदी संस्थान या सर्वांनीच आपले याबद्दल मनोगत व्यक्त केले.

              पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यातून काल्याच्या कीर्तनाला 1100 टाळकरी उभे होते,तर 10 हजारहुन आधीक भाविक भक्त व ग्रामस्थ काल्याच्या किर्तन व महाप्रसादासाठी उपस्थित होते.

              कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सप्ताह कमिटीचे कार्य अध्यक्ष ह भ प राम महाराज अभंग व ह भ प महेश सुतार महाराज यांनी केले. शेवटी काल्याच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.