वन्यजीव सप्ताह निमित्त वन्यजीव जनजागृती कार्यक्रम..

ऋषी सहारे

संपादक

       आरमोरी दि. 04-10-2023 रोजी जागतिक वन्यजीव सप्ताह निमित्त मौजा शंकरनगर येथे वनपरिक्षेत्र कार्यालय आरमोरी व संयुक्त वन व्यवस्थापन समिती शंकरनगर यांच्या वतीने वन्यजीव जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

           सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पवनकुमार जोंग (भा. व. से.) परिविक्क्षाधिन वनपरिक्षेत्राधिकारी आरमोरी,प्रमुख मार्गदर्शक अविनाश मेश्राम वनपरिक्षेत्राधिकारी आरमोरी, देवानंद दुमाने अध्यक्ष,वॄक्षवल्ली वन्यजीवन संरक्षण संस्था आरमोरी, शाम हुल्ला पथक प्रमुख( पं बंगाल) व ईतर मान्यवर उपस्थित होते.

       या कार्यक्रमामध्ये रानटी हत्ती यांना नियंत्रित कसे करायचे, त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करता येईल.रानटी हत्तीपासून धान पिकाचे रक्षण करण्यासाठी त्यांना हाकलून लावण्यासाठी कशाप्रकारे उपाययोजना करता येईल यासाठी प.बंगाल वरून खास हत्तींना परतून लावणयासाठी आलेले हल्ला पथकाचे प्रमुख शाम भाई यांनी प्रत्यक्ष गावकऱ्यासमोर हुल्ला बनवून त्याचा वापर कशाप्रकारे करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

          त्यानंतर आरमोरी येथील सर्पअभ्यासक देवानंद दुमाने यांनी सर्पविज्ञान कार्यक्रमात बिनविषारी,निमविषारी,विषारी सापाविषयीविस्तृत माहिती दिली. तसेच सर्पदंश झाल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार याविषयी माहिती देवून वन्यजीव मानव संघर्ष हे सातत्याने वाढत आहे.हा संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागासोबतच लोकांनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष पवनकुमार जोंग यांनी व्यक्त केले.

             मान्यवरांनी वन्यजीवांबाबत स्वसंरक्षण, मानव व वन्यजीव संघर्ष विशेषतः हत्ती व वाघ, साप याबाबत सुयोग्य मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास वनपरिक्षेत्र आरमोरी येथील वनाधिकारी, वन कर्मचारी तसेच मौजा शंकरनगर येथील ग्रामस्थ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमास मुखरू किनेकर क्षेत्र सहाय्यक पळसगाव, बाळु अतकरे वनरक्षक जोगीसाखरा, कु. सहारे वनरक्षक मंजेवाडा, कु. शेंडे वनरक्षक सालमारा सर्पमित्र वसीम शेख, कुनाल मने यांनी सहकार्य केले.