पेन्शनर संघटनेचे साकोलीत बीडीओंना निवेदन..

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

साकोली : भंडारा जिल्हा पेन्शनर असोसिएशन, तालुका शाखा साकोली वतीने मंगळवार ०४ जुलैला नुकतेच नविन रूजू झालेले पंचायत समिती खंड विकास अधिकारी पी. व्ही. जाधव यांना साकोली पेन्शनर संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 

       तालुका स्तरावरील पेन्शन अदालत विषयांतील काही मागण्यांवर साकोली तालुका पेन्शनर संघटनेतर्फे खंड विकास अधिकारी पी. व्ही. जाधव यांना निवेदन सादर करीत दिर्घकाळ चर्चा करण्यात आली. यात सर्व सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन १ ते ५ तारखेपर्यंत मिळण्यात यावी, नक्षलग्रस्त भागातील थकबाकी मिळण्यात यावी, वैद्यकीय परीपूर्ती मिळण्यात यावी, त्यांना उपदान ( भत्ता ) अंशीकरण मिळण्यात यावे, याबाबदचे निवेदन देत सर्व विषयांवर दिर्घ चर्चा करण्यात आली व खंड विकास अधिकारी यांनी सर्व प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी आश्वासन दिले. याप्रसंगी पेन्शनर असोसिएशन साकोली तालुका अध्यक्ष वि. ना. गि-हेपुंजे, आर. आर. डोंगरवार, भास्कर खेडीकर, बि. एम. फुलबांधे, विनोद फुंडे, बि.आर. चव्हाण, एम. गोंधळे, येरणे, लिला गौतम, प्रमिला सार्वे, कसारे, शेख, राजकूमार टेंभुर्णे, माधव टेंभुर्णे, केशव अतकरी, इटवले, गोस्वामी, गोबाडे आणि इतर सदस्यगण उपस्थित होते.