सोनोरी गावात दहा दिवशीय प्रशिक्षण शिबिराचे‌ आयोजन.

 

कैलास गजबे- करजगाव

 

चांदुरबाजार तालुक्यातिल सोनोरी गावा मध्ये बुद्ध जयंती निमित्त 26 एप्रिल ते ५ मे या कालावधीत दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे सोनोरी गावातील बुद्ध विहारांमध्ये आयोजन केले होते. 

प्रशिक्षण शिबिरासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय प्रशिक्षण विभागाने आपल्या सोनोरी गावासाठी केंद्रीय शिक्षिका लक्ष्मीताई सराटे यांना नेमून दिले होते. 

लक्ष्मीताई सराटे मॅडम यांनी दहा दिवसात एकूण २० विषयावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे ५ मे 2023 रोजी समारोपीय कार्यक्रम बौद्ध विहारांमध्ये पार पाडण्यात आला व केंद्रीय शिक्षिका लक्ष्मीताई सराटे त्यांचे स्वागत करून व भेटवस्तू देऊन व मॅडम ने खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार मानून समारोपीय कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमाला गावातील महीला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.