प्राचार्य हेमंत रामटेके व परिवारा तर्फ वृद्धांना किट्स चे वाटप.

 

ऋषी सहारे

संपादक

 

 गडचिरोली- तथागत बुद्ध जयंतीचे औचिंत साधुन गडचिरोली येथील वृद्धाश्रमातील वृद्धाना जिवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमा प्रंसगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विजय रामटेके गडचिरोली .रिपब्लिकन पार्टी चे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर ‘ व्यवस्थापक गंगाधर चंदावार आदी लाभले होते. बुद्ध पौणिमेचा दिवशी दरवर्षी प्राचार्य हेमंत रामटेके हे भोजनदान करायचे परंतु संध्यांचे वातावरण बघता त्यांनी वृद्धांना सहकार्य करण्याचे ठरविले आणि समाजाप्रती एक आदर्श निर्माण केला ‘ जिवनावश्य वस्तुचे वाटप करतांना डॉ. श्रृति विजय रामटेके , माला हेमंत रामटेके ‘ ज्योती विजय रामटेके . रुची हेमंत रामटेके , सचिन बोरकुटे आदी हजर होते. तर याप्रसंगी संचालक सुनिलभाऊ पोरड्डीवार यांनी शुभेच्छा दिल्यात. किट्स स्विकारताना वृद्धाश्रमातील प्रा. किरकीरे , मारोती कडुमवार, रामचंद्र गणविर , हरिचंद्र तोरे , अन्थोनी , कांताबाई कोठारवार ‘ मंजुळा टिकले , विमल रोहणकार इत्यादी प्रामुख्याने हजर होते.