पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :-
सध्या उन्हाळ्या चे दिवस सुरू आहे, त्यामुळे येथील नागरिकांच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे,आणि याच काळात देसाईगंज शहरातील नळांना मुबलक प्रमाणात पाणी येत नसल्याची तक्रार मागील अनेक दिवसांपासून देसाईगंज शहरातील नागरिकांची सातत्याने होत होती, या बाबत नगर परिषद येथे पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता पाण्याची टाकी भरीत असताना तेथील विद्युत पुरवठा नेहमी खंडित होत असल्यामुळे अडचणी येतअसल्यामुळे नळांना पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्यात अडचणी येत असल्याचे कारण नेहमी सांगितल्या जात होते, हा नेमका काय प्रश्न आहे याची शहा निशा करण्याकरिता महावितरण कंपनी च्या कार्यालयाला भेट दिली.
या वेळेस देसाईगंज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.लता मुरलीधर सुंदरकर, उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी, माजी उपाध्यक्ष मुरलीधर सुंदरकर, पाणी पुरवठा सभापती सचिन खरकाटे, सचिन वानखेडे यांनी भेट दिली व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चे उपकार्यकारी अभियंता अमर लिखार,अभियंता अनंत हेमके (शहर) हे सुद्धा उपस्थित होते. त्यांना देसाईगंज शहरातील विजेच्या समस्यांबाबत अवगत करून देण्यात आले, अधिकाऱ्यांनी काही तांत्रिक अडचणी नगर परिषद पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितल्या व यानंतर विद्युत प्रवाह खंडित होणार नाही याची दक्षता घेऊ असे ठोस आश्वासन उपस्थिताना दिले.
वास्तविक पाहता जेथे देसाईगंज शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो तिथे एक्स प्रेस फिडर लावण्यात आलेला आहे त्यामुळे येथील विद्युत प्रवाह कधीही खंडित होत नाही आणि असे होत असल्यास एक्स प्रेस फिडर ची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
या वेळेस प्रेस क्लब देसाईगंज चे अध्यक्ष प्रकाश दुबे,सचिव राजरतन मेश्राम,शामराव बारई,दिलीप कहुरके, विलास ढोरे,बाबू कुरेशी, हेमंत दुनेदार, महेश सचदेव आदी उपस्थित होते.
चौकट…
उन्हाळ्यातच नाही तर अनेकदा होत असलेली पाण्याच्या समस्येला नगरपालिका प्रशासनच जबाबदार आहे. नळ कनेक्शन देतांना मेन लाईन वरून कनेक्शन देता येत नाही. परंतु शहरातील काही हॉटेल, रेस्टारेन्ट मालकांनी आपली दुकानदारी चालावी म्हणून चक्क मेन लाईन वरून कनेक्शन घेतल्याची खात्रीदायक माहिती आहे. ज्यामुळे इतरांना वेळेवर पाणी उपल्ब्ध होत नाही. तर काही हॉटल मालकांनी एक-दोन बोअरवेल दोखल्यानंतरही पाणी न लागल्याने मेन लाईन वरून कनेक्शन घेतल्याचे समजते. याची संपूर्ण माहिती पालिका कर्मचारी यांना आहे. परंतु कनेक्शन देतांना आर्थिक देवाण-घेवाण झाल्याने तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार सुरू आहे. याबाबत मुख्याधिकारी यांनी कर्मचाऱ्याची बैठक बोलावून अनियमितता करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून मेन लाईन वर दिलेली कनेक्शन बंद करून त्यांनाही रेग्युलर लाईन वरूनच कनेक्शनची जोडणी करण्यास भाग पाडावे. त्यामुळे इतरांना मुबलक पाणी मिळू शकेल. तर या गंभीर बाबी कडे पालिका पदाधिकारी यांनी सुध्दा लक्ष देण्याची गरज आहे.



