Home Maharashtra ते अधिकारी वाळू-मुरुम माफियांचे व वेश्याव्यवसायासह अवैध धंदेवाल्याचे साथिदार आहेत काय? ...

ते अधिकारी वाळू-मुरुम माफियांचे व वेश्याव्यवसायासह अवैध धंदेवाल्याचे साथिदार आहेत काय? — गुंड प्रवृत्तीचा तो माफिया कोण? ज्याला अधिकारी घाबरतात… — “कायदा काम करेल,वेग घेईल,उद्या त्या अधिकाऱ्यांची वास्तव चिरफाड…

  वृत्तवेध

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

       चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील अधिकारी जर अवैध वेश्याव्यवसायाकडे,अवैधरित्या मुरुम व वाळू उत्खननाकडे,अवैध सट्टा व्यवसायाकडे,अवैधरित्या देशी दारु विक्रींकडे अजिबात लक्ष देत नसतील तर ते संबंधित अधिकारी,”माफियांचे साथिदार आहेत काय? हा मुद्दा मनाची संवेदनशीलता अधिकच तिव्रतेने समोर आणतो आहे.

             चिमूर शहरात वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांकडे डोळेझाकपणा करणे,तालुक्यात मुरुम व वाळूचे अवैध उत्खन मोठ्या प्रमाणात सुरु ठेवणे,सट्टा व्यवसाय बिनधास्त चालू देणे,चिमूर शहरासह ग्रामीण भागात देशी दारूची विक्री उघड्या डोळ्यांनी बघणे,हे महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य कोणत्या श्रेणीत मोडतय? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

     परंतू चिमूर तालुक्यात सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरळीत चालू ठेवण्यासाठी महसूल व पोलीस अधिकाऱ्यांना बांधून ठेवणारा तो माफिया आहे तरी कोण? हा प्रश्न गंभीर आहे….

        मात्र,चिमूर तालुकातंर्गत अवैध धंदे सुरु ठेवणारा माफीया कोणीही असो,तो कुठल्याही पदावर असो,पण तो कायद्यापेक्षा मोठा नाही आणि नागरिकांपुढे तो हुकुमशाह नाही हे त्या पडद्यामागच्या भेकड माफीयांनी लक्षात घेतले पाहिजे.

           या माफियाचा उद्देश स्पष्ट आहे.तो उद्देश म्हणजे चिमूर तालुक्यातील लोकांना अवैध धंद्यात अडकवून बरबाद करणे,चिमूर तालुक्यातील वाळू आणि मूरुम खनिज संपत्तीची खुलेआम लुट करणे,वेश्याव्यवसाय सुरु ठेवून चिमूर तालुक्याला कलंकित करणे,चिमूर तालुक्यात भेदाभेद वाढवून सामाजिक दूरी वाढविणे,आणि चिमूर तालुक्यातील महिला/पुरुषांना,युवक-युवतींना,विद्यार्थिनिंना,येनकेन प्रकारे अवैध धंद्यातंर्गत आपल्या जाळ्यात ओढून त्यांचा सातत्याने उपयोग करणे.

          सदर माफीयाने अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवून ठेवले असले तरी तो माफिया कायद्याला आणि जनतेला वेठीस धरू शकत नाही एवढे निश्चित आहे.

          चोर नेहमी चोरी करतात,पण ते स्वत:च कायद्याच्या चौकटीत एक दिवस अडकतात.तद्वतच अवैध धंदेवाईक आपापले धंदे मोठ्या प्रमाणात सुरु ठेवण्यासाठी नेहमी अधिकाऱ्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा आधार घेतात.छुप्या मार्गाने आर्थिक लेनदेन करतात हे नाकारता येत नाही.

         छुप्या संबंधांमुळेच,”अवैध धंदेवाईकांचे कायद्याने वाकडे करण्याची जबाबदारी,संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी पेलावत नाही असे विचित्र चित्र चिमूर तालुक्यात निदर्शनास येते आहे. 

         लोकसेवक आणि लोकसेवा या सपथेला चिमूर तालुक्यात पायदळी तुडविले जात असल्याने,”संबंधित अधिकारी बेशिस्ती अंतर्गत बेलगाम व मुजोर झाले आहेत?,हे वास्तव पचविणारे नाही..

         म्हणूनच अवैध धंदेवाईक हे शिरजोर झाले असून,त्यांचा बंदोबस्त करणे अवघड झाले असले तरी कठीण अजिबात नाही.कायदा जेव्हा कामी लागतो,वेग घेतो,तेव्हा शिरजोर झालेले अवैध धंदेवाईक सपाट होतात,भुमिगत होतात,हे सुद्धा एक सत्यच आहे.