Home देशविदेश जगाची विनाशाकडे वेगाने वाटचाल,म्हणजे जगाने जागतिक तत्ववेत्त्यांच्या तत्वज्ञानाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच! –...

जगाची विनाशाकडे वेगाने वाटचाल,म्हणजे जगाने जागतिक तत्ववेत्त्यांच्या तत्वज्ञानाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच! – लेखाचा उत्तरार्ध….

       जगात अनेक धर्म आहेत.जगातील प्रत्येक व्यक्ती कोणत्यातरी धर्माचा अनुयायीआहे.जर कुणी नास्तिक असेल तर तो चार्वाकवादी असेल.या सर्वांमधून जर कुणी सुटलाच तर तो निश्चितच मानवता धर्माचा अनुयायी निश्चितच असेल.

      जगातील सर्व धर्म माणसाला माणूस बनवण्यासाठीच निर्माण झालेली आहेत.असे असताना सुद्धा या जगातील मानव….

       दानव,का झालीत ( बहुमताच्या अर्थाने )..?

या प्रश्नाचे कोडे आजपर्यंत कुणीही सोडवलेले का नाही..

     याचा अर्थ स्पष्ट आहे की,एक तर धर्म चुकीचे असतील किंवा माणसं चुकीचे असतील,किंवा धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे चुकीचे असतील,किंवा मग धर्म प्रसार करणाऱ्यांचे आचरण शुद्ध नसेल,किंवा मग धर्माच्या मुळ तत्वज्ञानात कुणीतरी एखाद्या विषारी विचाराची बीजे पेरली असावीत.या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम मी वाचकांवर सोडतो.

        परंतु ,एवढे निश्चित की माणसासाठी धर्म आहे.धर्मासाठी माणुस नाही.हा विचार मात्र जगात आजपर्यंत रुजू शकला नाही.म्हणून जगात या सर्व वाईट घडते.हे मात्र प्रत्येकाला मान्य करावे लागेल.

      याचे आणखी एक कारण निश्चित असेल की प्रत्येक धर्माच्या तत्वज्ञानात निसर्ग तत्वज्ञानविरोधी अर्थात मानवताविरोधी कृत्रिम…

          “कुटनितीने” शिरकाव केल्यामुळेच जगात वाईट घडत आहे!

      याचे समीक्षण असे की,जगाने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातुन कोणताही धडा न घेता, ज्या युद्धातून जागतिक प्राण आणि वित्तहानी अमर्याद होऊन सुद्धा ( आकड्यात सांगणे आणि तीचे वर्णन करणे शक्य नाही ) तिसऱ्या जागतिक अंतिम अणु युद्धाकडे वेगाने होणारी वाटचाल……

      याचा अर्थ हाच की आम्ही जागतिक स्तरावर एक माणूस म्हणून सिद्ध होऊ शकलो नाही. हेच सिद्ध होते.

       6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशीमा आणि नागासाकी शहरावर दोन अणुबॉम्ब टाकल्यानंतर अवघ्या 5 वर्षातच रशिया आणि अमेरिकेत 1960 नंतर शीतयुद्ध सुरु झाले की आपापल्या गटात स्वतंत्र राष्ट्राना आपल्याकडे खेचण्यासाठी.या दोन राष्ट्राच्या अमानवीय कृतीतून आजपर्यंत चार वेळा अणुयुद्धाचा भडका उडता,उडता टळल्या गेला….

       प्रथम 24 आक्टोबर 1962 , त्यानंतर लगेच 48 तासाच्या आत.नंतर 1979 मध्ये, त्यानंतर 1995 मध्ये टळल्या गेला.आणि विशेष म्हणजे केवळ 3 ते 5 मिनिटांच्या कालावधीत!

         जर त्या 3 ते 5 मिनिटाच्या काळात हालचाल केली नसती तर कदाचित आज आपण दिसलो सुद्धा नसतो.एवढी महाभयंकर स्थिती जगाच्या पटलावर 4 वेळा येऊन गेली!

     म्हणून काही ही वेळ कायमची टळली असा याचा अर्थ अजिबात नाही. उलट ती आता…….

अमेरिका – इराण…

  रशिया -युक्रेन…

     इस्राएल – गाझा…(इतर मुस्लिम राष्ट्रे)

        दक्षिण आणि उत्तर कोरिया वरील देशातील स्फ़ोटक परिस्थितीचा स्फ़ोट कधी होईल याचा नेम नाही.

      आपल्या भारतीयांचं एक खूप चांगलं आहे…

       की जोपर्यंत माझं जळत नाही,तोपर्यंत मला कळत नाही. शेजारचे घर जळत असेल,तर त्यात मी वांगं भाजायला टाकलं होतं,ते शोधण्यासाठी मी तिथे जातो.अशी आमच्या भारतीयांची मानसिकता झाल्यामुळे या आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडणाऱ्या घडामोडीचे आम्हाला काहीही घेणे देणे नसते!

      हीच आमची वैचारिक मानसिकता आमच्या हजारो वर्षाच्या गुलामीला कारणीभूत आहे.हीच मानसीकता आम्हाला संविधानातून जागृत होऊ देत नाही.हीच मानसिकता आम्हांला महापुरुषांचे त्याग,संघर्ष आणि समर्पण समजू देत नाही.हीच मानसिकता आम्हाला माणूस बनन्यापासून रोखते,हीच मानसिकता विज्ञानवादी,विवेकवादी अर्थात मानवतावादी बनू देत नाही.!

      या कुविचाराची देण ही मनुस्मृतीची अर्थात बाहेरून आलेल्या आर्यांची आहे.म्हणजेच ब्राम्हण्य वृतीची आहे.

     तिला कायमचे ठेचणे हेच आपले कर्तव्य आहे….

     कारण हीच वृत्ती राजकारणात घुसल्यामुळे राजकारणातून समाजासमाजात,घराघरात घुसल्यामुळेच आमचा देश आता परकीयांच्या नव्हे तर आम्ही आमचेच गुलाम होऊन बसलो आहोत!

     हे जर सर्व टाळून माणूस म्हणून आपल्याला सिद्ध व्हायचं असेल तर इतर सर्व धर्मांपेक्षा सर्वश्रेष्ठ असलेल्या….

    मानवता धर्माचा स्वीकार करावा लागेल.त्यासाठी त्या धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणजे….

     भारताच्या संविधानाला समजून घेऊन,जागृतीतून अविष्कार करावा लागेल. इतर कोणताही पर्याय नाही….. 

     तेंव्हाच आपण जागतिक तत्ववेत्त्यांचे तत्वज्ञान समजून घेऊन, विनाशाकडे वेगाने जाणाऱ्या जगाला, पर्यायाने स्वतःला वाचवू शकतो…

***

टीप :- तुमची प्रत्येकाची विनंती असेल,तर चार वेळा अणुयुद्ध कसे टळले याचा थरारक प्रसंग मी पोस्ट मधून सांगू शकतो.

अर्थात…

आवाहनकर्ता आणि जागृतीचा कृतिशील लेखक…

   अनंत केरबाजी भवरे…

संविधान विश्लेषक,रेणापूरकर, औरंगाबाद,78754526689..