Home Crime अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई… — चिमूर...

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई… — चिमूर तहसील ला दोन्ही ट्रॅक्टर जप्त..

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी..

चिमूर : – चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेतीची वाहतूक मोठ्या जोमाने सुरू असून यावर कुठेतरी अंकुश लावण्यासाठी महसूल विभागाने तालुक्यात फिरते पथक तयार करून रेती चोरट्या माफियांवर कारवाई मोहिम राबविणे सुरु केली आहे.

       दिनांक.०४/०४/२०२५ ला अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना विना नंबरचे ट्रॅक्टर ट्रॉली मुंड्यासह पकडली.या ट्रॅक्टर मालकाचे नाव राकेश दशरथ भोयर असून चिमूर शहरात ( धम्मा ) या नावाने प्रसिद्ध आहे आणि चिमूर येथील राहिवासी आहे. 

              तर वाहन चालकाचे नाव सुनिल गंगाधर कुळमेथे राहणार पिंपळनेरी येथील आहे.आज पहाटे रात्रीच्या अंधारात वेळ ०३:१५ वाजताच्या सुमारास उप जिल्हा रुग्णालय जवळील वाटर फिल्टर ला लागूनच असलेल्या उमा नदी पात्रातील बंधारा जवळील धारणे यांच्या शेतातच हि कारवाई करण्यात आली.

      तसेच दुसऱ्या ट्रॅक्टरवर सुद्धा सकाळी वेळ ०६:४४ वाजताच्या सुमारास मानेमोहाळी ते नदीघाट पांदन रस्त्यावर एम एच ३४ ए बी २५८८ या क्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली व विना नंबरचा मुंडा रेतीने भरलेले महसूल विभागाचे फिरते पथकाने पकडले असून या वाहन मालकाचे नाव आसिफ शेख राहणार मासळ तर वाहन चालकाचे नाव सुधाकर धारणे राहणार मासळ असे आहे.

        हि संपूर्ण कारवाई चिमूर तहसीलचे तहसीलदार श्रीधर राजमाने यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार निकूरे तर मंडळ अधिकारी पाचभाई व तलाठी प्रसाद घोडघासे,संदिप मुंदे,वैभव कल्याणकर,चंद्रकांत ठाकरे आदींनी कारवाई केली.