Home देशविदेश विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे काय? का? आणि कशासाठी?..

विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे काय? का? आणि कशासाठी?..

         दिनांक 28 फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी नांदेड येथे 20 वे विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे, या संमेलनाची पूर्वतयारी म्हणून आम्ही काही लोकांना भेटायचे ठरविले, या भेटीदरम्यान आम्हाला असे निदर्शनास आले की, शिकलेले लोक सुद्धा विद्रोह म्हणजे काय ? असा प्रश्न आम्हाला विचारीत होते, केव्हा त्यांना आधी विद्रोह म्हणजे काय हे समजावून सांगावे लागते आहे, याचे कारण म्हणजे येथील प्रस्थापितांची शिक्षण व्यवस्था होय. 

     ” विद्रोह ” याचा अर्थ वैचारिक आणि कृतिशील विरोध,संघर्ष, बंड, उठाव,कुस्ती,स्पर्धा,लढाई म्हणजेच विद्रोह होय.

   विद्रोही विचार म्हणजे कोणते विचार ? असा प्रश्न पडतो.याचे उत्तर असे की,विद्रोही विचार म्हणजे समतेचे,बंधुभावाचे,स्वातंत्र्याचे,समतेचे,न्यायचे,समाजवादाचे,धर्मनिरपेक्षतेचे,सार्वभौमत्वाचे,प्रेमाचे,सलोख्याचे, दया क्षमा शांतीचे,सत्य न्याय नीतीचे,मानवतेचे,सकलजन हिताचे, विज्ञानाचे, संत महात्मे महामानवांचे विचार म्हणजेच विद्रोही विचार होत.

       हा विद्रोह कुणाचा ? कुणासाठी ? आणि कुणाच्या विरोधात ? हा पण प्रश्न विचारणारे लोक आहेत.या प्रश्नाचे उत्तर असे की,दरिद्री,गरीब,भिकारी,वंचित,मध्यमवर्गीय , आणि श्रमिक,कष्टकरी,शेतकरी,शेतमजूर, रोहयो चे मजूर,कारखान्यातील कामगार,दुकानदार,छोटे व्यापारी,कंपनीतील कर्मचारी ,सरकारी आणि खाजगी व्यवसायातील नोकरवर्ग ,हातगाडी, ऑटो रिक्षा,हमाल,सुशिक्षित बेकार म्हणजेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत आणि बेकार व बेजार असलेल्या जनतेसाठी आणि यांच्या समस्यावर लिखाण करणारे कवी,कथा कादंबरीकार,वक्ते,विचारवंत,कलाकार,चित्रकार,शिल्पकार,समीक्षक, पत्रकार यांचे आणि यांच्या साहित्याचे ,यांच्या साहित्याला संधी ऊर्जा प्रेरणा अभिव्यक्ती देणारे हे साहित्य संमेलन आहे.

   कुणाच्या विरोधासाठी हा विद्रोह आहे ? प्रस्थापित भांडवली,जमीनदारी,मनुवादी ब्राम्हणशाही विरोधी,प्रस्थापितांच्या विरोधी विस्थापिता ची ही लढाई आहे.हा संघर्ष हा विद्रोह आहे.15 टक्के अभिजन आणि महाजन विरोधी 85 टक्के बहुजन समाजाची ही लढाई आहे.लढाईसाठीच हा विद्रोह आहे.

उजव्या विचारसरणी विरुद्ध म्हणजेच प्रतिगामी विषमतावादी शोषण आणि दमन कारी वर्गाच्या विरोधी ,हा विद्रोह आहे,मालक वर्गाच्या विरोधी गुलामांचा हा विद्रोह आहे.मनुवाद आणि भांडवलवादाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरकार विरोधी हा विद्रोह आहे.प्रतिगामी मनुवादी भांडवलवादी सत्तेला मदत करणाऱ्या बहुजन नेते आणि पक्षांना विरोध करण्यासाठी हा विद्रोह आणि हे विद्रोही संमेलन म्हणजे विद्रोही विचार आणि कृती आहे.विद्रोही संमेलन म्हणजे बंडाचे बिगुल आहे,तुतारी आहे,मशाल आहे.

    जे साहित्य प्रस्थापितांचे गुणगान गाते,विषमतेची पाठराखण आणि रुजवण करते,शासन आणि शोषणाचे धडे शिकविते,श्रीमंतांचा शोक,मजा,शृंगार,प्रेमाचे चाळे,सुख चैनीचे जीवनाचे प्रदर्शन मांडते,स्पर्धा,बाजार,यास प्रोत्साहन देते,त्यांची भलावण करते,ज्या साहित्यात ,गाण्यात,चित्रपटात,मालिकेत केवळ सुंदर बागा,सुंदर बंगले,सुंदर जलाशय,घोडे गाड्या विमान दाखविल्या जाते,जुगार शराब, बाई बाटली नंगानाच दाखविला जातो,असे साहित्य म्हणजे प्रस्थापितांचे सुख चैनीच्या जीवनाचे साहित्य,आणि ज्या साहित्यात दुःख दारिद्र्य अद्न्यान,विषमता,गुलामगिरी, दास्य,स्त्रीपुरूष विषमता,शोषण ,गरीबी,दारिद्र्य याचे चित्रण आणि त्यामुळे होणारे संघर्ष याचे चित्रण लिखाण केल्या जाते,ते साहित्य म्हणजेच विस्थापितांचे साहित्य होय.या विस्थापितांच्या साहित्यांच्या साहित्यकार चे संमेलन म्हणजेच विद्रोही साहित्य संमेलन होय.

    विद्रोही साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश म्हणजे भारतीय संविधानाचे संरक्षण करणे,लोकशाही टिकविणे,समतावादी सरकार आणि व्यवस्था स्थापन करणे हा आहे.

   करिता या विचाराशी संमत असलेल्या सर्वांनाच विनंती की,आपण या 20 वे विद्रोही साहित्य संमेलन नांदेड, सायन्स कॉलेज मैदान येथे 27 फेब्रुवारीला रात्री नाटक पाहण्यासाठी पाणी 28 फेब्रुवारी आणि एक मार्च या दोन दिवशी कवी कथा परिसरात त चर्चासत्र मुलाखती यासाठी महाराष्ट्रातून दिग्गज साहित्यिक येणार आहेत त्यांच्या विचाराचा आणि कौशल्याचा लाभ घ्यावा तसेच या संमेलनास आर्थिक सहकार्य करावे ही विनंती. कारण हे विद्रोही साहित्य संमेलन प्रस्थापितांच्या विरोधी असल्यामुळे सरकारची मदत घ्यायची नाही या ठाम निर्णय आणि आजपर्यंत 19 फेब्रुवारी साहित्य संमेलने जनतेच्या मदतीनेच घेण्यात आलेले आहेत, या संमेलनास पूर्ण महाराष्ट्रातून आणि नांदेड जिल्ह्यातून पाच ते दहा हजार लोक येणार आहेत, त्यातील दोन हजार लोकांच्या जेवणाचा खर्च आणि पाचशे लोकांचा राहण्याचा खर्च करायचा आहे, स्टेज व्यवस्था आणि शामियाना मंडप हा खर्च एकूण पंधरा लाखाच्या वर जाणार आहे, म्हणून आपण आपल्या परीने आपल्या वतीनुसार जसे जमेल तसे दिलेल्या बँक खात्यात आपले योगदान आपले निधी जमा करावी ही कळकळीची आणि नम्र विनंती. 

       लेखक : दत्ता तुमवाड

            संमेलन सदस्य नांदेड

                फोन : 9420912209