मालेवाडा येथे प्रतिकृती विजय स्तंभाला मानवंदना… — क्रांतीज्योती सावित्रीबाईला विनंम्रपणे अभिवादन..

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

      चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहारात भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव प्रतिकृती विजय स्तंभाला उपासक उपसिका यांनी मानवंदना दिली.

     भीमा कोरेगावच्या इतिहासाबाबत बौद्ध पंच कमिटीचे अध्यक्ष जगदीश रामटेके यांनी भाषणातून मार्गदर्शन केले. 

         दि. 2 जानेवारीला रात्री 8.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाने उपासक उपसिका व गावकरी यांची मने जिंकली.

         तर दि. 3 जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने दुपारी बारा वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

        कार्यक्रमाची सुरवात महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,रमाई,छत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करुन करण्यात आली.

         नंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.नितीन रामटेके सर,प्रमुख पाहुणे राऊत मॅडम, प्रज्ञा खोब्रागडे मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते. 

       यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक – युवतींना आयु.रणजीत बोरकर, दिवाकर वाघमारे यांचे कडून स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाची पुस्तके भेट देण्यात आली.

        सामाजिक कार्यातील सक्रिय योगदानाबद्दल आयु. प्रदीप मेश्राम यांचा सत्कार आयु. दुर्योधनजी गजभिये यांचे हस्ते करण्यात आला.

        सदर कार्यक्रमाचं संचालन आयु. सुप्रिया ताई मेश्राम यांनी केल तर समीक्षा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

        नववर्षाच्या सुरुवातीला झालेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमातून शौर्य,आत्मसन्मान, शिक्षण,स्त्री-पुरुष समानता, कलागुण आणि सामाजिक उत्तरदायित्व या मानवी मूल्यांच्या संदेशासह नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व सामाजिक सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

        बौध्द पंच कमेटी,भीमज्योती महिला मंडळ,ग्राम पंचायत पदाधिकारी,शाळेचे शिक्षक – विद्यार्थी,उपासक – उपासिका, गावकरी बांधवांच्या सहकार्यातून आनंदमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.