बेबस ” हिंदी चित्रपट बघाच! — महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य कलावंतांना व नागरिकांना नवसंजीवनी,उर्जा व दिशा देणारा असेल.

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

            वृत्त संपादीका 

             कृपाल लंजे लिखित,निर्मित आणि दिग्दर्शीत “बेबस “हिंदी चित्रपट येत्या १२ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित होतो आहे.

          विदर्भातील आठ सिनेमा हॉल,ज्यामध्ये जयश्री टॉकीज नागपूर,राजकला टॉकीज चंद्रपूर,प्रभात टॉकीज गोंदिया,महावीर टॉकीज साकोली,स्नेहल टॉकीज तिरोडा,गोल्ड सिने मॅक्स टॉकीज ब्रम्हपुरी,सत्यम टॉकीज गडचिरोली,मा.सा.कन्नमवार हॉल मूल मध्ये प्रदर्शित होणार असून,हा चित्रपट विदर्भाच्या माती मध्ये विदर्भातील प्रतिभावंत कलाकारांना घेऊन तयार करण्यात आलेला आहे.

          प्रतिभा किंवा कलागुण हे मोठ्या शहराची मक्तेदारी नाही,एखादा उत्कृष्ट कलाकार हा छोट्या शहरात किंवा खेड्यातील एखाद्या गरीब कुटुंबात सुध्दा जन्माला येऊ शकतो.

        फक्त गरज आहे त्यांच्या डोक्यावर विश्वासाने हात ठेऊन फक्त लढ म्हणायची!..

          या चित्रपटात सर्व जातीच्या,धर्माच्या लोकांनी भुमिका केली आहे.आज आपण बघतो की सिनेमा म्हटल तर मुंबई – पुणे येथील निर्मात्यांची मक्तेदारी झाली आहे आणि खर म्हटल तर त्यात चकित होण्यासारखं पण नाही.

         कारण सिनेमा म्हटल की चंदेरी दुनिया आणि त्या साठी लागतो बक्कड पैसा.पण खरंच पैसाच सर्वत्र महत्वाचा आहे का? तर नाही.

         बेबस चित्रपटात १५० हून अधिक लोकांनी सहकार्याची भूमिका ठेऊन जे काम त्यांना सोपवीले ते काम पूर्ण केलय आणि बेबस नावाचा हिंदी चित्रपट तयार केला. 

            भंडारा जिल्हातंर्गत साकोली तालुक्यातील मौजा पिंडकेपार सारख्या छोट्याशा खेळ्यात,गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला कृपाल लंजे हे सिनेमा बनवायचं स्वप्न बघतात आणि स्वहिमतीवर सहकार्याची भूमिका घेऊन ते स्वप्न पुर्ण करतात.

          यात सर्वांनी पुढाकार घेतले तर चित्रपट यशस्वी होईल च.पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे भाविष्यात एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा,एखाद्या मजुराचा मुलगा,एखादा कटिंग सलून चालवणारा,एखादा ड्रायव्हर,एखादा सेक्युरीटी गार्ड,एखादा पान टपरी चालवणारा किंवा एखादी गरीब कुटुंबातील मुलगी किंवा स्त्री हे स्वप्न बघू शकते की त्यांच्या किंवा शेजारच्या घरात असलेल्या टी. व्ही.वर त्यांनी केलेला सिनेमा प्रदर्शित होऊ शकतो आणि सार जग त्यांच्या कलेचं कौतुक करू शकतो.

          गरज आहे ती फक्त वातावरण निर्मितीची,संधीची, आणि त्यांच्या कलेला फुंकर घालण्याची.या चित्रपटात तुम्हाला आशुतोष सादमवार,ममता गोंगले,सचिन गेडाम,संतोष कुमार,सुनील कुकुडकर,नीलेश जंपलवार,प्रफुल येलचलवार, कुमुदिनी भोयर,रितेश चौधरी,नयना खोब्रागडे,माही देशवाल,करिष्मा मेश्राम,अविनाश पाटील,मयूर राशेट्टीवार,भास्कर पिंपळे,अमोल गेडाम,मिष्टी बोलिवार,अनिरुद्र सादमवार,विनोद बोलिवार आणि अन्य १५० कलाकारांच्या कलेची उत्तम मेजवानी पहायला मिळणार आहे.

           या चित्रपटाचे गीत संतोष कुमार यांनी लिहिले असुन संगीत बद्ध केल आहे भास्कर पिंपळे यांनी,चित्रपटाचे गीत अंकीता टाकले आणि रुपाली राऊत यांनी गायले.

        तसेच या चित्रपटाचे छायाचित्र संचालन धर्मेश कावळे यांनी केले व मुख्य संपादक म्हणुन सिद्धार्थ राऊत यांनी भूमीका पार पाडली आहे.

        विदर्भाच्या कुशीत १२ जानेवारीला प्रदर्शित होणारा,”बेबस,हा हिंदी चित्रपट महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य कलावंतांना आणि नागरिकांना नवसंजीवनी,उर्जा,व दिशा देणारा ठरेल असे समजायला हरकत नाही.