Home शैक्षणिक श्री ज्ञानेश्वर विद्यालयात विज्ञान व संगणक प्रदर्शन…

श्री ज्ञानेश्वर विद्यालयात विज्ञान व संगणक प्रदर्शन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :- ‘नाते विज्ञानाशी… मैत्री संगणकाशी’ या ब्रीदाखाली श्री ज्ञानेश्वर विद्यालयात विज्ञान व संगणक प्रदर्शनाचे उद्घाटन एमआयटीचे विभागप्रमुख इसाक सिखलगार यांच्या हस्ते झाले.

          इयत्ता ५ ते १० च्या विद्यार्थ्यांनी ७१ प्रकल्प सादर केले. ऊर्जा, शेती, जलशुद्धीकरण आदी विषयांवर नाविन्यपूर्ण मॉडेल्स पाहायला मिळाली. संगणक विभागात व्हिडिओ, नाटिका व रांगोळी प्रदर्शन आकर्षण ठरले. निबंध, वक्तृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

          समारंभाला शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, मुख्याध्यापक सूर्यकांत मुंगसे यांसह मान्यवर उपस्थित होते. इन्स्पायर अवॉर्ड विजेती अनिशा शिंदे हिचा सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय उदमले, सूत्रसंचालन योगेश मठपती, तर आभार अनुराधा खेसे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.