जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अरविंद राठोड गुरुजी यांची निवड… — आदिवासी अवघड क्षेत्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिलादेवी गाव येथे कार्यरत.

 

कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी :-

         पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिलादेवी येथे कार्यरत असलेले शिक्षक अरविंद किसनराव राठोड यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नागपूर जिल्हा परिषदच्या वतीने निवड करण्यात आली आहे. 

        ५ सप्टेंबर शिक्षक दिना निमित्त डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे.

             पारशिवनी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिलादेवी गाव येथे कार्यरत शिक्षक अरविंद किसनराव राठोड यांना मिळाला आहे. 

          आदिवासी अवघड क्षेत्रात मागील ९ वर्षापासून कार्यरत आहेत.शाळेतील पटसंख्या २० असुन,आपल्या स्तरावर सर्वांगसुंदर शाळा उभारण्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे.

               याचबरोबर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न राठोड यांनी केले.विद्यार्थ्यांना शाळेतच आनंददायी अध्यापन करुन शाळा बाह्य विद्यार्थिनींना सुध्दा शाळेची ओढ लावणारे शिक्षक राठोड एक उत्तम कबड्डी खेळाडू आहे.

            त्यामुळे खेळाडू वृत्तीने विद्यार्थी जिवणात व आपल्या शाळेचे विद्यार्थी सुध्दा खेळाडू म्हणून नाव लौकीक करावे यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.

         अशा हरहुन्नरी शिक्षकांच्या समन्वयातूनच शालेय विद्यार्थ्यांच्या गरुड भरारी करीता पंखांना बंळ देण्यासाठी शिक्षक राठोड आजही प्रयत्नशील आहेत. 

          शिक्षक राठोड यांना नागपूर जिल्हा परिषद तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

           त्यानिमित्ताने अरविंद किसनराव राठोड यांचे सौ. मंगलाताई निम्बोने सभापती पंचायत समिती पारशिवनी,उपसभापती करूणाताई भोवते,राजुभाऊ कुसुंबे शिक्षण सभापती,जिल्हा परिषद सदस्य सौ अर्चनाताई भोयर,डॉ.इरफान अहमद शेख,अफरोज खान,बापू पाटील तरार,माजी उपसभापती चेतन देशमुख,राम धोटे जिल्हा अध्यक्ष शिक्षक काॅग्रेस,श्रीधरजी झाडे महासचीव आदिनी अंभिनंदन केले.