कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी : –
तालुकातंर्गत कांद्री वार्ड क्र. ३ ढिवर मोहल्ला शिवनगर येथे राहणारे बालकिसन विरचंद मनघटे यांचा मागील भागाच्या घराला देवघरातील दिव्यामुळे अचानक आग लागल्याने घरातील कपड्यासह जिवनापयोगी सामुग्री जळुन राख झाली आहे.
आगीत जळलेल्या वस्तू अंतर्गत अंदाजे विस हजार रुययांचे नुकसान झाल्याचे भाडेकरु यांनी सांगितले.
प्राप्त माहिती नुसार अनिल जगदीश शुक्ला वय ५० वर्ष हे मागील ४ वर्षा पासुन श्री. बाळकृष्ण बीरचंद मनघटे वय ७० वर्ष रा. वार्ड क्र.३ ढीवर मोहल्ला शिवनगर कांद्री यांचे घरी भाड्याने राहत आहे.
आज सोमवार (दि.४) सप्टेंबरला सकाळी १० वाजताच्या दरम्यान भाड़ेकरू अनिल शुक्ला हे घरुन पुजा पाठ करुन दाराला कुलुप लावून कामावर गेले होते.
सकाळी ११.३० वाजता दरम्यान घराच्या आत आग लागल्याने घरातून धुवा निघत असल्याचे नागरिकांना लक्षात येताच त्यांनी घराकडे धाव घेत घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला व प्रथम सिलेंडरला बाहेर काढले व वेकोलि खदान येथील अग्निशमन बंब बोलावुन पाण्याचा फवारा मारुन आगीवर नियंत्रण मिळवले.
ही आग घरातील देव्हा-यातील दिवा उंदिराच्या धक्काने पडुन घराच्या आत आग लागली असुन आगित घरातील कपडे व जिवनापयोगी सामग्री जळुन राख रांगोळी झाल्याचे अंदाजे बिस हजार रुययांचे नुकसान झाल्याचे भाडेकरू अनिल शुक्ला यांनी सांगितले.
सदर घटनेची माहिती कांद्री नगरपचायत,तलाठी महेंद्र क्षीरसागर व कोतवाल चंदु निखार यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून अहवाल तहसिलदार पारशिवनी याना पाठविणार आहे.