(मुक्त काव्य )
भारतीय संविधान हे
आम्हा भारतीयांचे
आम्ही निवडून दिलेल्या
संविधान सभेच्या लोकप्रतिनिधींनी
प्रदीर्घ चर्चा करून
सर्व समितीने,मंजूर केलेले
भारतीय संविधान
म्हणजे आमचेच संविधान होय.
जे आहे सर्वांसाठीच,सर्व भारतीय नागरिकांसाठी!
भारतीय संविधान हे
नाही एका वर्गासाठी,
असो कुणी गरीब
असो कुणी मध्यम
असो कुणी श्रीमंत
सर्वासाठी संविधान एकच!
सर्वासाठी कायदा एकच,
गरिबांसाठी कायदा एक
तर श्रीमंतांसाठी दुसराच
असा भेद नसे संविधानात,
म्हणून संविधान हे सर्वांचे,सर्वासाठी.—१
असो जात कोणतीही
असो धर्म कोणता
भेदभाव वर्म नाही दुजा
संविधान हे हक्काचे
संविधान हे सर्वांचेच —२
सर्वांना समान संधी
सर्वांचा दर्जा समान,
नाही इथे उच्चनीचता भेदभाव
कायद्याने सर्व समान
असे हे सर्वासाठी,सर्वांचेच
भारतीय संविधान —३
सार्वभौमत्व ,समाजवाद,
धर्मनिरपेक्षता लोकशाही
हे स्वप्न महान,
तुम्हा आम्हा सर्वांचेच
आहे हे भारतीय संविधान –४
स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय
हे तत्व,हे सिद्धांत,हे विचार
मानवतावादी,शास्त्रीय,मानवमुक्तीचे
मानव प्राणी पक्षी यांच्या
हक्क आणि अधिकाराचे
जन्माला येऊन,मरेपर्यंत
जगण्याचे,जिवंत राहण्याचे
हे तत्व स्वीकारते
भारतीय संविधान!
आहे सर्वांचे,
आम्हीच निर्माण केलेले
आमच्या विचाराचे,
भाव विश्वाचे,
आमच्याच मेंदूचे,हृदयाचे,मनगटाचे,
आमचेच आमच्यासाठीच
आम्हा भारतीयांचे
हे भारतीय संविधान
सर्वासाठी सर्वांचेच.- — 5
आम्ही भारताचे लोक
भारतीय नागरिक
आमचे पहिले नाते ‘ भारतीय ‘ म्हणूनच.
दुसरे नाते रक्ताचे,
नंतर जातीचे
नंतर धर्माचे
तरीही पण आपले नाते
प्रथम नाते हे ” भारतीय ” च.
बंधुभावाचे,माणुसकीचे,मानवाचेच….
ज्याचे गुण आहेत
दया क्षमा अहिंसा सत्य न्याय
आणि अंतिम धेय्य शांती,सुरक्षितता….
म्हणूनच आमचे भारतीय संविधान जगात महान!
विश्वाने गौरविले
आपण सर्वसंमतीने स्वीकारले
आपल्या सर्वांचेच हे
प्रिय संविधान — 6



