Home क्रीडा रोलर स्पोर्ट्स कोचेस असोसिएशन नागपूरच्या वतीने आर स्कॅन सुपर स्केटर नागपूर स्केटिंग...

रोलर स्पोर्ट्स कोचेस असोसिएशन नागपूरच्या वतीने आर स्कॅन सुपर स्केटर नागपूर स्केटिंग चॅम्पियनशिप 2025 चे आयोजनाचे समापन…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

      एन.एम.सी.स्केटिंग रिंक महिला महाविद्यालय नंदनवन नागपूर येथे दिनांक 01/06/2025 ला करण्यात आले होते. या स्पर्धेत विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणाहून 600 हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला व त्यात चिमूर स्केटिंग अकॅडमीच्या स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करीत 7 पदक काबीज केले.

       ज्यामध्ये 2 स्वर्ण पदक,2 रौप्य पदक,3 कास्य पदकांचा समावेश करीत चिमूर चे नावलौकिक केले.स्पर्धेत 6 वर्षे वयोगटातील रिद्धीशा उमेश काटेकर हिने दुसऱ्या स्थानावर रोप्य पदक पटकाविले.

            7 वर्षे वयोगटातील खुशाली लोथे हिने स्वर्ण पदक,अद्विता टिकेश्वर नागोसे हिने कास्यपदक व सम्यक चेनिशराम मेश्राम याने कांस्यपदक पटकाविले.8 वर्षे वयोगटातील पीहल प्रशांत सूर्यवंशी हिने रोप्य पदक पटकाविले.

     10 वर्षे वयोगटातील हृद्यांश उमेश काटेकर याने पहिले स्थान काबीज करत स्वर्ण पदक,राजवी अरविंद लोथे हिने कास्यपदक पटकाविले.

       12-14 वर्ष वयोगटातील निर्णय रुपेश पडवे व अनुष श्रीकांत मारगोनवार यांनी दमदार कामगिरी करत आपला सहभाग नोंदविला.सर्व विजेते स्केटर्स चिमुर स्केटिंग अकॅडमीचे नियमित खेळाडू असून चिमूर स्केटिंग अकॅडमी तसेच संपूर्ण चिमूर वासीयांकडून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे. 

       सर्व विजेते स्केटर्स आपल्या यशाचे श्रेय कोच रोशनी उमेश काटेकर तसेच आपले माता व पिता यांना देत आहेत.