Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… – बस स्थानकहून प्रवाशांसह बसला नेली पोलीस ठाण्यात..  ...

ब्रेकिंग न्यूज… – बस स्थानकहून प्रवाशांसह बसला नेली पोलीस ठाण्यात..  — साकोली आगार प्रमुखांच्या मध्यस्थीने प्रवाशी रवाना…  — छिंदवाडा – गोंदिया बस चालकाचा धक्कादायक प्रकार..

ऋग्वेद येवले..

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : प्रवाशांना नागपुरात सोडून बस आणली. साकोली बसस्थानक येथे बसमध्ये आलेले प्रवाशांचे सामान घेण्यासाठी बसमध्ये चढले असता हेकडशाही चालकाने वाद घातला. 

    हपोलीसांनी तेथेच वाद शांत केल्यावर ती बस गोंदिया येथे न नेता प्रवाशांसह कुणाचीही परवानगी न घेता साकोली पोलीस ठाणे येथे आणली. 

      ६० ते ७० प्रवाशांची गैरसोय होत आहे हे पासून आगार व्यवस्थापक सचिन आगरकर यांनी मध्यस्थी करून अखेर ताटकळत ठेवलेल्या सर्व प्रवाशांना बस सोडुन प्रवाशांना रवाना केले.

      यामध्ये चालकाचा निष्काळजीपणाने महिलेच्या बॅग मधील सोन्याचे मंगळसूत्र व दागिने हे मात्र अनावधानाने चोरी गेले नाहीत. 

          बुधवार ०४ जून स. ०८:३० छिंदवाडा – गोंदिया बसने मध्यप्रदेश उमरानालाहून महिला ( उमरानाला – साकोली तिकीक नं. ००३५६८९ ) साकोलीसाठी बसले. 

       नागपुरात लघुशंकेसाठी वाहकांना महिलेने सांगून उतरले असता सामानांसह बस निघून गेली.महिला दूस-या बसमध्ये आली.पण महिलेच्या सामानात पैसे आणि मंगळसूत्र दागिने होते म्हणून साकोलीत असलेल्या मुलांना फोन लावले. 

      बस साकोली बसस्थानक येथे ०२:३० ला आली असता महिलेच्या मुलांनी गाडीत बॅग आहे सांगितले. चालकाने म्हणाले की गोंदिया येथे येऊन बॅग न्या. यावरून वादविवाद झाला. 

       तेवढ्यात पोलीसांनी मध्यस्थी केली व आगार प्रमुख समोर चालकाने बस गोंदियाला न्यावी अशी सुचनाही दिली.पण त्या हेकडशाही चालकाने ६० ते ७० प्रवाशांसह बस कोणाचीही परवानगी न घेता ती छिंदवाडा ते गोंदिया बस साकोली पोलीस ठाणे येथे उभी केली.

       यात प्रवाशांना १ तास मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे पाहून आगार व्यवस्थापक सचिन आगरकर हे चमुंसह पोलीस ठाणे पोहचले आणि मध्यस्थीने बस पुन्हा गोंदियाकडे रवाना करून ताटकळत ठेवलेल्या सर्व प्रवाशांना दिलासा दिला. 

            या प्रकरणी जर त्या महिलेचे बसमध्ये सुटलेला बॅगेतील दागिन्यांची चोरी झाली असती तर याला वाहक की चालक जबाबदार असते?…

      साकोली येथे बस आल्यावर ५ मिनिटेही बॅग शोधायला त्या हेकडशाही चालकाला वेळ नव्हता का.? आणि बसस्थानक वरून कुणाच्या परवानगीने बस गोंदिया प्रवास न गाठता पोलीस ठाणे येथे उभी केली. 

      यावरून त्या हेकडशाही चालकावर सर्व महिला पुरुष प्रवाशी हे चांगलेच संतापलेल्या भूमिकेत होते.