आजचा निकाल काहीही येवो, आपल्याला मात्र संकट आले म्हणून खचायचे नाही…

             जिंकलो म्हणून काही विजयोत्सव साजरा करत बसायचं नाही…

       अब की बार 400 पारचा नारा EVM ने RSS व मोदी – शहासाठी जरी यशस्वी केला, किंवा त्यांना स्पष्ट बहुमताने सत्तेवर जरी बसविले, किंवा घोडेबाजार करून कुबड्या घेऊन जरी सत्तेत बसविले……….

            तर देशप्रेमी, संविधाननिष्ठ जनतेला मात्र कुटनीतीच्या गुलामीत जाणाऱ्या देशाला, लोकशाहीला, संविधानाला ICU मधून बाहेर काढण्यासाठी………….

         तन,मन आणि धनाने सर्वार्थाने समर्पित होण्यासाठी, प्रसंगी रस्त्यावर सुद्धा उतरण्याची तयारी ठेवावी लागेल…..

         आणि जरी इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले,किंवा कुबड्या घेऊन जरी त्यांना सरकार स्थापन करता आले…….

         तरी सुद्धा आपल्याला ( संविधाननिष्ठ सर्वसामान्य जनतेला ) हुरळून न जाता, विजयोत्सव गुलाल उधळून साजरा न करता गेल्या 45 वर्षात काँग्रेसनी ज्या चुका केल्या, ज्यामुळे RSS व भाजप सारख्या संविधानविरोधी शक्तीची शक्ती वाढली.त्या चुका त्यांच्या लक्षात आणून देऊन त्यांना संविधानावरच 100% देश चाळविण्यासाठी भाग पाडणे हेच आमचे पुढील कर्तव्य असेल…..

           त्यासाठी 5 जून 2024 पासून केवळ संविधानदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात गुलामीकडून स्वातंत्र्यकडचा प्रवास संपून , आता स्वातंत्र्याकडून गुलामीकडे ( मनुस्मृतीवर आधारित ) कोरोनाच्या गतीने प्रवास सुरु झालेला आहें……..

     असे समजून काम करावे लागेल.

         त्यासाठी एकच आपण आपल्याकडे संपत्ती जपून ठेऊया की,कितीही मोठे,आणि कितीही भयानक संकट जरी आले किंवा या व्यवस्थेने आणले, तरी आपल्यातील विज्ञानवाद, विवेकवाद,मानवतावाद जो निसर्गनियमावर आधारित आहें. असा…….

     “आत्मविश्वास,

       आपण कधीही न ढळू देता मनाचे खच्चीकरण होऊ द्यायचे नाही.

अरे एकट्या….

 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मानवतावादी विद्वत्तेच्या बळावर याच मनुवादी विरोधकांना चारीमुंड्या चीत करून,”संविधान क्रांती घडवून आणली,…..

       आपण तर त्यांची लेकरं आहोत आपल्या रक्तात तो अणुवांशिक गुणधर्म आहेच……

       आपण सर्वजण मिळून बाबासाहेबांच्या मेंदूचा थोडासा भाग जरी झाला तरी भरपूर आहें….

      म्हणून आपल्याला त्यासाठी निःस्वार्थाने,त्याग,संघर्षाने,समर्पित होण्याची मानसिक व शारीरिक तयारी ठेवावी लागेल….

             आवाहनकर्ता

              अनंत केरबाजी भवरे 

        संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689