अपघातात सहाजनांचा मृत्यू… — दु:खद् घटना..

 

   दिक्षा कऱ्हाडे

   वृत्त संपादिका 

        मौजा कान्पा येथे लक्झरी व अल्टो मध्ये धडक होऊन सहाजणांचा मृत्यू झाला असल्याची दुःखद् घटना दुपारी तीन वाजता घडली असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

          नागपूर वरुन किन्ही येथे जात असताना चंद्रपूर जिल्हातंर्गत नागभिड तालुक्यातील मौजा कान्पा येथे अपघात झाला.

           अपघातग्रस्त लक्झरीचा क्रमांक एआरबी,एम.एच.३३,टी.२६७७ असा आहे तर अल्टो मारुती सुझुकी चारचाकी वाहनाचा क्रमांक एम.एच.४९,बी.आर.२२४२ असा आहे.

         लक्झरी गडचिरोली वरुन नागपूरला जात होती तर अल्टो वाहनातील नागरिक नागपूर वरुन किन्हीला नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते.अल्टो मारुती सुझुकी चारचाकी वाहनाच्या चालकाच्या हयगयीमुळे अपघात झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.

          अपघाताची माहिती नागभिड पोलिस स्टेशनचे ठाणेदार घारे यांना मिळताच त्यांनी अपघात स्थळ गाठले व स्थळ पंचनामा करून मृत्यूदेहाला शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय नागभिड येथे हलविले.

      मृतांमध्ये रोहन विजय राऊत वय ३० वर्षं,ऋषिकेश विजय राऊत वय २० वर्षं,सौ.गिता विजय राऊत वय ४५ वर्ष, सुनीता रुपेश फेंडर वय ४० वर्ष, कुमारी यामीनी रुपेश फेंडर वय ९ वर्षं,यांचा समावेश आहे.कुमारी यामीनी ही नागपूरला उपचारासाठी नेत असताना दगावली..

      ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी ठोसरे यांनी घटनेची इतंभूत माहिती ठाणेदार घारे यांच्या कडून घेतली.