भारतीय जनता पार्टी शाखा कोरची तर्फे देशभक्तोंका अपमान नही सहेगा हिंदुस्थान‌ स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा….

ऋषी सहारे

संपादक 

 कोरची 

           भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुमारे 7लक्ष देशभक्त क्रांतीकारकांनी भारत मातेला आपल्या रक्ताने अभिषेक वाहीला तेव्हा कुठे भारताला स्वातंत्र्य मिळाले,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षांत या स्वातंत्र्य विरांचा सन्मान करणे तर दूरच केवळ आपला राजकीय स्वार्थ ‌सांधण्यासाठी काँग्रेस पक्षांकडून या महापुरूषांचा वारंवार अपमान‌ केल्या जात आहे. 

      ‌ ‌‌ पारतंत्र्य काळात देश इंग्रजांच्या गुलामगिरीत असतांना प्रखर राष्ट्रवादाची ज्वार जागृत करून इंग्रजी राजवटीचा पाया हलविणारे ज्यांना इंग्रजांनी काळया पाण्याची शिक्षा ठोठावून ज्यांचा अगणित छळ केला अशा ” स्वातंत्र्यवीर “सावरकर गौरव यात्रा “आयोजित करण्यांत आलेली आहे. ‌                  कोरची तालुका भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या विघमाने ” स्वातंत्र्यवीर सावरकर या गौरव यात्रेत मोठया संख्येने सहपरिवार सहभाग होवून  स्वातंत्र्यवीरांचा गौरव वाढवावा या करीता दिनाक ४ एप्रिल २०२३‌ रोज मंगळवारला सकाळी ११ वाजता जुनी नगंरपंचायत‌ पासुन कोरची येथील मुख्य मार्गाने हनुमान मंदिरा पर्यंत रैली काढण्यात आली. रैलीतील घोषवाक्याने कोरची शहर दुमदुमून गेले होते. 

           नंतर हनुमान मंदिर मध्ये सभा घेवून मार्गदर्शन करण्यात आले .या गौरव यात्रेमध्ये ‌भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किशनभाऊ नागदेवे, आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार‌ कृष्णाजी गजभे ,जिल्हा भाजपा उपाध्यक्ष मोतीलाल कुुकरेजा,संदानद कुथे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलुभाई हुसैनी,प्रा.देवराव गजभिये, , नसरूद्दीन भामानी तालुका अध्यक्ष, नगरसेवक शैलेन्द्र बिसेन,आंनद चौबे‌ माजी तालुका अध्यक्ष, ,कमलनारायण खडेलवार, मधुकर नखाते,अनिल वाढई, मेघश्याम जमकातन,गोविंद दरवडे,नैताम कौसिक,सुंदरू नैताम,सखाराम भानारकर,गृडुभाऊ अग्रवाल,बळीराम दरवडे,रूपराज देवागन,टेमलाल देवागन,अरून नायक,सदाराम नुरुटी पंचायत समिती सदस्य,भिकम फुलकवर, बळीराम दरवडे,नंदू पजवानी,,विलास अंबादे प्रकाश कौसिक,केशव मोहुले, सुरेश काटेंगे,रामकुमार नायक,यंशवत वाळदे,महेश भानारकर,ज्योती नैताम माजी नगराध्यक्ष ,दुर्गा मडावी नगरसेविका,उल्हास देशमुख,अक्षय सांगोळे,डा,विश्वास,शिला सोनकोतरी,प्रतिमा मडावी नगरसेविका,सरपंच सुनिता‌ मडावी,परदेशी दुधकवर,दिपक नायक,रुपेश गंगबोईर,दयाराम गुरुभेलीया,सुरेश तांडेकर,गजानन भारद्वाज सरपंच राहुल मलगाम,दुपाल नैताम ,जयाताई सहारे, प्रा.बळीराम श्रीरामे,हेमीनबाई केवास,उपसरपंच हेंमेद्र कावळे,केशव मोहुले नगरसेवक विठृल गुरूनुले ,नैताम कौसिक,बापुजी उईके,आदि मान्यवर उपस्थित होते.

  ‌ हनुमान मंदिरात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,सदस्य, प्रास्ताविक प्रा. देवराव गजभिये ,आमदार कृष्णाभाऊ गजभे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच किसन नागदेवे यांनी मार्गदर्शन केले आभारप्रदर्शन आनंद चौबे माजी तालुका अध्यक्ष यांनी मानले .