Home कृषी प्रलंबित धान खरेदीचे चुकारे उद्या खात्यात जमा होणार, माजी आमदार कृष्णा गजबे...

प्रलंबित धान खरेदीचे चुकारे उद्या खात्यात जमा होणार, माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना दिलासा…

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी 

देसाईगंज :- सन 2025 -2026 या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाद्वारे सरकारी आधारभूत किमतीने खरेदी केलेल्या धनाची चुकारे प्रलंबित होते. यासंदर्भात माजी आमदार कृष्णा गजबे हे सतत सरकारशी संपर्क साधत होते आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित धनाचे चुकारे मिळवण्याचा प्रयत्न करत होते.

           आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने शेतकऱ्यांच्या प्रलंबित जिल्ह्यातील 17 जानेवारी पर्यंत विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 68 कोटी रुपये उद्या दि. 05/02/2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत असे आदेश जारी केले आहेत.

           माजी आमदार कृष्णा गजबे म्हणाले की,धान खरेदीच्या देयाकामध्ये होणाऱ्या विलंबनामुळे शेतकरी चिंतेत होते.जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी भरघोस पीक घेतले होते.आणि सरकारी खरेदी केंद्रावर धान विकले होते. परंतु या धनाचे पैसे प्रलंबित होते. मी शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारला कळविल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष बोललो.