प्रा.महेश पाणसे सरांचा अभिष्टचिंतन व गौरव सोहळा थाटात संपन्न.. — मान्यवरांना केले सन्मानित.. — चिमूर तालुका अध्यक्ष केवलसिंग जुनीसह अनेकांचा गौरव.. — अभिष्टचिंतन व गौरव सोहळ्याचे उत्तम नियोजन.

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक 

          महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रा.महेश पाणसे सरांच्या सामाजिक दायित्वाचा सहृदय, सस्नेह अभिष्टचिंतन व गौरव सोहळा मुल येथे काल थाटात संपन्न झाला.

        अभिष्टचिंतक व गौरव व्यक्तीमत्व प्रा.महेश पाणसे हे अभिष्टचिंतन व गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आकर्षक होते.

      या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चोरडिया हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुल पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील परतेकी, सा.बा.विभाग मुलचे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले,नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक झाडे,राजूरी स्टिल एण्ड आलोय इंडिया कंपनीचे व्हि.पी.सुमीत खेमका,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष अनुपकुमार भार्गव,जेष्ठ पत्रकार बाळूभाऊ भोयर वरोरा,म.रा.प.सघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप शेंडे,म.रा.प.स.गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रुपराज वाकोडे हे होते.

             आयुष्य म्हणजे स्वतःला निट घडविणारा व सुयोग्य सांभाळणारा कार्यकाळ आणि कर्तव्य काळ.

        तद्वतच सहकार्याच्या आणि कार्याच्या माध्यमातून इतरांना मदत करणारा,इतरांना घडविणारा,इतरांना सांभाळणारा सद्भावनांचा दक्ष कार्यकाळ व संवेदनशीलतातंर्गत कर्तव्यकाळ..

           अशाच व्यक्तींचा अभिष्टचिंतन व गौरव सोहळा काल थाटात संपन्न झाला,त्यांचे नाव आहे प्रा.महेश पाणसे सर!

             ते उत्कृष्ट प्राध्यापक,दक्ष पत्रकार,सहृदय मित्र,उतंम मार्गदर्शक,न बोलता भावना व्यक्त करणारे हृदयस्पर्शी स्नेही,पोटतिडकीने भावना व्यक्त करणारे दिशादर्शक आणि इतर बरेच गुणसंपन्न…

            महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अंतर्गत विदर्भ विभागीय अध्यक्ष म्हणून प्रा.महेश पाणसे सरांनी,अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्या सामाजिक दायित्वाचे महत्वपूर्ण योगदान समोर आणले व मित्रत्वातील आंत्तरभाव घट केलीत, असे लक्षात येते.

          “पदे येतात आणि जातात,मात्र कर्तव्य व कार्य आजीवन कायम राहतात.म्हणूनच उत्तम कार्ये व कर्तव्ये पार पाडणाऱ्या व्यक्तींची ओळख ही वेगवेगळी असली तरी ती मार्गदर्शक व दिशादर्शक असते हे कालच्या अभिष्टचिंतन व गौरव सोहळ्याचे निमित्ताने स्पष्ट झाले.

        अभिष्टचिंतक व गौरवक प्राध्यापक महेश पाणसे सरांचा सपत्नीक सन्मानपूर्वक सत्कार सामुहिकपणे करण्यात आला व केक कापून त्यांचा ५५ वा वाढदिवस आनंदोत्सवाने साजरा झाला.

         यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व गौरवक मुल पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील प्ररतेकी,मुल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले,नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक झाडे,राजुरी स्टिल एण्ड आलोय इंडिया कंपनीचे व्हि.पी.सुमित खेमका,जेष्ठ पत्रकार बाळूभाऊ भोयर यांच्या कार्याचा उतंम आढावा घेत मुल मराठी पत्रकार संघाद्वारे त्यांचा शिल्ड व शाल अन्वये सन्मानजनक सत्कार करण्यात आला.

         तद्वतच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष अनुपकुमार भार्गव,म.रा.म.प.सं.नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप शेंडे,म.रा.म.प.सं.गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रुपराज वाकोडे यांचा सुध्दा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुल द्वारे आदरतिथाने सन्मान करण्यात आला.

         याचबरोबर चंद्रपूर जिल्हातंर्गत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्षांच्या कार्याची दखल घेत त्यांना शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.यात चिमुर तालुका अध्यक्ष केवलसिंग जुनी,नागभिड तालुका अध्यक्ष सुधाकर श्रिरामे,सिंदेवाही तालुका अध्यक्ष नागराज मेश्राम,चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष प्रा.धनराज खानोरकर,बल्लारपूर तालुका अध्यक्ष मनोहर दोतपल्लीवार,घुग्गूस,वरोरा आणि इतर तालुका अध्यक्षांचा सुध्दा सन्मान करण्यात आला.

        या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हातंर्गत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक दखल न्यूज भारत वेब पोर्टलचे प्रबंधक मुख्य संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय पदाधिकारी प्रदीप रामटेके यांनी केले तर सुत्रसंचलन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हा पदाधिकारी सुलेश्वरी बालपांडे,(ब्रम्हपुरी)यांनी केले.

     आभार व सहसुत्रसंचलन मुल तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी राजू सर यांनी केले.

         अभिष्टचिंतन व गौरव सोहळ्याचे उत्तंम आयोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनीष रक्षमवार यांच्या सह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मुल तालुका अध्यक्ष सतीश राजुरवार व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.