आरमोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न….

प्रितम जनबंधु

    संपादक 

आरमोरी:- दिनांक ३/१/२०२४ रोजी “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” याच्या जयंतीचे औचित्य साधून आरमोरी येथील विश्राम गृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरमोरी तर्फे संघटनात्मक आढावा बैठक रविन्द्रजी वासेकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. 

                 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याची १९२ वी जयंती साजरी करुन आढावा बैठकीला सुरुवात करण्यात आली. 

                 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विस्तार करण्यासाठी तालुक्यात बुथ समिती गठित करणे, राष्ट्रवादी फ्रंटचे व सेलचे कार्यकारीणी तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळेच एक्क निर्माण करा व संघटन मजबुतीकरण करा असा मौलिक मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष रवींद्रजी वासेकर यांनी केले. 

          यावेळी आढावा बैठकीत युनुसभाऊ शेख प्रदेश संघटक सचिव, लिलाधर भरडकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, केसरी पाटील उसेंडी माजी सभापती, योगेश नांदगाये जिल्हाउपाध्यक्ष, ज्ञानेश्वर पायधन जिल्हाध्यक्ष सेवादल, अमिनभाऊ लालानी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, सुनिल नदंनवार कार्यकारी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, प्रदीप हजारे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, अनुज घोसे आरमोरी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, दिवाकर गराडे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, आशुतोष भरणे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, दिपक बैस जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया, अनिल आलबनकर तालुका सरचिटणीस, तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ आकरे, योगेश थोराक , सौ. संगिता मेश्राम शहर अध्यक्ष महिला आघाडी, प्रफुल राचमलवार शहर उपाध्यक्ष रा. काॅ., उमेश दुमाणे तालुका सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस, प्रितम जनबंधू तालूका सचिव, कुणाल चितगेलवार तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचिरोली, भुवन बोरकर सोशल मीडिया प्रभारी आरमोरी व राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.