Home Political तळोधी नाईकचे काँग्रेसचे उपसरपंच प्रकाश धानोरकर यांचा भाजपात प्रवेश….

तळोधी नाईकचे काँग्रेसचे उपसरपंच प्रकाश धानोरकर यांचा भाजपात प्रवेश….

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

           चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून तळोधी नाईक कांग्रेसचे उपसरपंच प्रकाश धानोरकर यांनी भाजपात प्रवेश केला.

           चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक हे गाव राजकीय महत्व प्राप्त आहे तळोधी ग्रामपंचायत वर सध्या काँग्रेसची सत्ता आहे येथील उपसरपंच प्रकाश धानोरकर यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया याचा होत असलेला विकासाचा सपाटा बघून प्रेरित होऊन भाजपात प्रवेश केला. यामुळे पुन्हा भाजप मजबुती कडे वाटचाल करीत आहे.

             आमदार बंटी भांगडिया यांच्या वाड्यावर प्रवेश प्रसंगी भाजप जेष्ठ नेते राजु देवतळे, पस माजी सदस्य अजहर शेख,भाजपा युवा नेते समीर राचलवार,संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष संजय नवघडे,महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ मायाताई नन्नावरे,तळोधी चे माजी सरपंच कलीम शेख, निलेश गभणे,युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर, तळोधी येथील भाजपा नेते नामदेव नन्नावरे, वनसमिती अध्यक्ष किशोर येसांबरे, भाजपा युवा नेते अविनाश सोनवाने, गोवारी समाज अध्यक्ष हरिश्चंद्र नेवारे, टेकेपार आदिवासी सोसायटी उपाध्यक्ष रमेश भोयर, माधव वांढरे, नथुजी श्रीरामे, अशोक नेवारे,बूथ अध्यक्ष अंकुश मेश्राम,सलीम शेखआदी तळोधी (नाईक) भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.