पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व माध्यम अधिस्वीकृती समितीची बैठक…

 

   बाळासाहेब सुतार 

 निरा नरशिंहपुर प्रतिनिधी

                पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे येथे दि. 1 ते 2 ऑक्टो. रोजी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व माध्यम अधिस्वीकृती समिती बैठक संपन्न होत आहे. या बैठकीस चंद्रकांतदादा पाटील (मंत्री उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा), हर्षवर्धन पाटील (माजी मंत्री व विश्वत, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट कुलपती, पिंपरी चिंचवड विद्यापीठ), यदुनाथ जोशी (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व माध्यम अधिस्वीकृती समिती) हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

       महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्रे, वृत्तसंस्था, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे आणि इतर सर्व वृत्तप्रसार माध्यम संस्था यामध्ये वृत्तसंकलनाचे काम करणारे राज्यातील पत्रकार हे अधिस्वीकृती समितीचे सदस्य आहेत. या बैठकीच्या निमित्ताने येणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अधिस्वीकृती समितीच्या सन्माननीय पत्रकार बांधव सदस्यांचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे ज्ञानेश्वर लांडगे अध्यक्ष, डॉ. राजीव भारद्वाज प्र. कुलगुरू, श्रीमती पद्माताई भोसले उपाध्यक्षा, डॉ. गिरीष देसाई कार्यकारी संचालक, विठ्ठल काळभोर सचिव, डॉ. डी. एन. सिंह निबंधक, शांताराम गराडे कोषाध्यक्ष, डॉ. मणिमाला पुरी प्रभारी कुलगुरू यांनी तसेच पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.