Home Social साकोलीचे नंबर १ स्मार्ट डिजिटल ग्राम वलमाझरीला भेट… — व्हीआयपी, फ्रिडम...

साकोलीचे नंबर १ स्मार्ट डिजिटल ग्राम वलमाझरीला भेट… — व्हीआयपी, फ्रिडम व साकोली मिडीयातर्फे स्मार्ट डिजिटल हिरो सरपंच पुरूषोत्तम रूखमोडे यांचा सत्कार…

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : “मनात ठेवले मी माझ्या गावाचा पारदर्शक विकास, काही वेगळेच करून दाखवायची चिकाटी व जिद्द, ठेकेदारीमुक्त ग्रामपंचायत आणि सुजाण ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमाने आज महाराष्ट्रात साकोलीच्या वलमाझरीचे नाव चमकले, हा प्रयत्न माझ्या जागरूक ग्रामस्थांनी करून दाखविला व आज त्याचे फळ समोर आले आहे” असे फुल्ली डिजिटल स्मार्ट गटग्रामपंचायतचे यशस्वी युवा सरपंच पुरूषोत्तम रूखमोडे यांनी ( रवि. ०३ ऑगस्ट ) ला वलमाझरीत भेट दौऱ्याला आलेल्या व्हीआयपी ग्रुप, फ्रिडम युथ फाऊंडेशन व साकोली मिडीयाच्या चमुंपुढे बोलताना व्यक्त केले. येथे कर्तव्यदक्ष सरपंच यांचा समुहाकडून सत्कार करण्यात आला. 

        महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त स्मार्ट व फुल्ल डिजिटल ग्राम म्हणजे साकोली तालुक्यातील वलमाझरीचे नाव घेतले जाते. येथील “ग्राम संसद” भवन असे वाटते की, एखाद्या दिल्ली भवनात आपण आलोय. आज रविवारी व्हीआयपी ग्रुप, साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशनच्या संचालकांनी स्मार्ट ग्राम वलमाझरीचा दौरा काढला. संचालक अनिल कापगते, युवा सामाजिक कार्यकर्ता महेश पोगळे, आशिष चेडगे, किशोर बावणे, पत्रकार मनिषा काशिवार, ऋग्वेद येवले, शिक्षक हरिशचंद्र सोनवाने, रणविर कापगते यांनी या डिजिटल स्मार्ट गटग्रामपंचायतचे खरे पारदर्शक हिरो सरपंच पुरूषोत्तम रूखमोडे यांचा शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.

        बोलतांना सरपंच यांनी सांगितले की, मनात प्रथम माझ्या गावाचा संपूर्ण पारदर्शक विकास करणार, ठेकेदारी मुक्त गाव करणार, एकही गैरव्यवहार होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला तर हे शक्य आहे. आज सर्व कर्तव्यदक्ष उपसरपंच व सदस्यगणांच्या अथक परिश्रमाने आपले वलमाझरी हे गाव जणू महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील एक आदर्श गटग्रामपंचायत म्हणून नाव करून दाखविणार हिच माझी जिद्द आहे असे प्रतिपादन केले.

         या गावात सर्व जागी सीसीटीव्ही कॅमेरे, लोकवर्गणीतून विकास, ग्रामविकासाला व पारदर्शकतेला प्रथम प्राधान्य, कचरा विलगीकरण, गावात वॉश बेशिंग, शाळा सुसज्ज व पूर्ण स्वच्छता गृह युक्त, पळसबाग, सांडपाणी व्यवस्थापन, मुलं जन्माला आला तर वृक्ष लागवड, नर्सरी, सौर ऊर्जेचे पथदिवे, जल संधारण, प्रत्येक घरोघरी नळ, प्लॉस्टीक बंदी यांसह नियमित कर भरणाऱ्या जनतेला ध्वजारोहणाचा मान दिला जातो. हे विशेष या गावाचे गौरव आहे.

         या व्हीआयपी ग्रुप साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशन कडून स्मार्ट ग्राम सरपंच पुरूषोत्तम रूखमोडे यांचा सत्कार करताना ग्रामसेवक नरेश शिवणकर, कर्मचारी विनोद कंगाले गंगाधर लांजेवार, भिमराव गायकवाड यांसह अनेक ग्रामस्थांनी येथे उपस्थिती लावली होती.