शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या विदर्भात साहित्यिक क्षेत्रात कवयित्री शैलाताई चिमड्यालवार यांचे नाव परिचित आहे.
प्रथम ग्रामीण भागात वास्तव नंतर शहरी भागाकडे वाटचाल करीत त्यांनी साहित्य क्षेत्रात आपलं एक भरीव अस्तित्व निर्माण निर्माण केलं!
मूल तालुक्यातील एका छोट्याशा गावात अनेक दिवस घालविल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी शहरी भागाकडे जाण्याचा निर्णय घेतला.व त्यांचा निर्णय यशस्वी देखील ठरला.त्यांची ही वाटचाल मुळातच एका व्यवसायिक निमित्ताने होती.आज सावलीच्या मुख्य मार्गावर त्यांचे किराणा दुकान उभे झाले. या सोबतच त्यांचा धान खरेदीचा व्यवसाय! हा सर्व व्यवसाय घरच्या सोबतच त्या देखील सांभाळत आहेत.
शालेय जिवनापासून शैलाताईंना वाचनाची आवड! त्यातूनच त्यांना साहित्य लिखाणाची आवड व गोडी निर्माण झाली.हजारों कविता त्यांनी रिकाम्या वेळेत लिहुण काढल्या! अनेक कविसंमेलनात त्यांचा सहभाग राहिला.त्यांच्या कवितेचा दर्जा नेहमीच उत्तम राहिला.एव्हढेच नाही तर अनेक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत.त्यांचे हे उल्लेखनीय कामगिरी बघत सहज सुचलंच्या मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांनी त्यांचेवर सहज सुचलंच्या मार्गदर्शिकाची जबाबदारी सोपविली आहे.
संस्कारधारा हे सदर त्या नियमितपणे सहज सुचलंवर लिहीत आहे.त्यास वाचकांचाही प्रतिसाद मिळतोय आहे.



