ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : देवशयनी आषाढी एकादशी निमित्त संत शिरोमणी नरहरी महाराज विठ्ठल रखुमाई मंदिरात गोपाल काला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे.
भारतीय सोनार समाज शाखा साकोलीच्या वतीने रविवार दिनांक 6 जुलै 2025 ला संत शिरोमनी नरहरी महाराज विठ्ठल रखुमाई मंदिर नवीन बस स्टँड समोर साकोली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने सकाळी दहा वाजता पूजा करण्यात येणार आहे दुपारी एक वाजता भजन व गोपालकाला सायंकाळी चार ते सहा वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत शिरोमणी नरहरी महाराज विठ्ठल रखुमाई मंदिर यांच्या वतीने करण्यात येत आहे.


