स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..

 

उमेश कांबळे ता प्र भद्रावती

       महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांचे दिनांक 30 मे ला दुःखद निधन झाले . त्यांच्या या निधनाने त्यांच्या कुटुंबियावर दुखाचे डोंगर कोसडले होते आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककडा पसरली. आमचा निडर नेता कालचक्राच्या चक्रात कर्दनकाळ झाल्याने आमच्या उरलेल्या समस्या मार्गी कोण लावेल? असा प्रश्न त्यांच्या चाहणाऱ्या जनतेमध्ये निर्माण झाल्याचे दिसत होते. त्यानिमित् त्यांचा दिनांक 4 जुलैला तालुका व शहरातील काँग्रेस पक्षाचे मित्र परिवारांनी स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, या भव्य रक्तदान शिबिरात समस्त नागरिकानी रक्तदान करण्याचे आवाहन कांग्रेस चे आमदार प्रतिभाताई धानोरकर आणि अनिलभाऊ धानोरकर, नगराध्यक्ष, न प भद्रावती यानी केले आहे.

      या नेत्याने शासकीय असो व निमशासकीय सामाजिक असो व धार्मिक कार्य जनतेच्या प्रत्येक प्रश्नांना व समस्येला निराकरण करून जनतेच्या मनात जागा मिळवून त्यांनी राजकारणाच्या पायरीत आपला ठसा उमटवून आपली एक छाप सोडली. आपल्या घरचा असो वा दारचा, आपल्या हक्काचा खासदार या नात्याने त्यांचा भद्रावती शहराच्या स्थानिक घरावर आपल्या समस्येचा डोंगर खेचत जनतेने आपली आपबीती व व्यथा वक्त केलेली आहे. मी तुमच्या खासदार या नात्याने लोकांचे स्थानिक पातळीवरील समस्या व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ढाण्या वाघ म्हणून आपली ओळख निर्माण करावी लागली. या ढाण्या वाघाने जनतेसाठी आपली जी ओडख निर्माण केली आहे, आणि त्यांचे उरलेली स्वप्ने ही ढाण्या वाघाची वाघिन पूर्ण करेल अशी जनतेच्या मनात डरकाडी फोडत एक ऊर्जा निर्माण केली आहे.

       येत्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर् येत्या काही दिवसात मतदार नोंदनी च्या प्रक्रियेला सुरवात होत असुन आपला सहभाग नोंदवावा असे प्रखर मत आमदार प्रतिभाताई धानोरकर व्यक्त केले आहे.

अनिल धानोरकर, नगराध्यक्ष,

     न प भद्रावती 

या भव्य रक्तदान शिबिरात समस्त नागरिकानी उत्स्फुर्त् प्रतिसाद देवून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.