पर्यावरण जन जागृतीसाठी पेडल अप सायकल रॅलीचे चिमूरात आयोजन.. – सायकल ग्रुप चिमूरचा उपक्रम..

प्रमोद राऊत

चिमूर तालुका प्रतिनिधी 

       पर्यावरण रक्षणाच्या जनजागृती साठी 3 जून जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल चालन्याने आपल्या शरीराला होणाऱ्या फायद्याविषई भव्य सायकल रॅलीचे आयोजन सायकल ग्रुप चिमूरच्या वतीने करण्यात आले होते. 

       तीन जून जागतिक सायकल दिनानिमित्त आज सकाळी सहा वाजता सायकल ग्रुप चिमूरच्या वतीने सायकल रलीचे आयोजन करण्यात आले. श्रीहरी बालाजी देवस्थान येथून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगदिया यांनी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ. पोलीस निरीक्षक मनोज गभने. नायब तहसीलदार आशिष फुलके. व्यापारी असोशीयशनचे अध्यक्ष प्रवीण सातपुते यांचे उपस्थितीत रॅलीला हिरवी झेंडी दाखउन सर्व उपस्थित मान्यवर सायकल रॅलीत सहभागी झाले. पर्यावरण जन जागृती व सायकल चालवील्याने आपल्या शरीराला होणाऱ्या फायद्याविषई जागतिक सायकल दिनानिमित्त जनजागृती संदेश यावेळी देण्यात आला. श्रीहरी बालाजी मंदिरातून रलीला सुरुवात झाल्यानंतर अभ्यंकर मैदान ते शहरातील मुख्य मार्गाने रॅली मार्गक्रमन करीत बालाजी रायपूरकर सभागृहात सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला. 

     या वेळी सायकल ग्रुपचे सुनील पोहनकर. चंद्रकांत पतरंगे. शिवशंकर हरणे. विवेक मारकवार. सुभाष केमये. संतोष महाकाळकर. झुरमुरे सर. जयंत निवडींग. आकाश बनकर. तुषार रासेकर. यांनी अथक परिश्रम घेतले.