Home Vidarbha खाणगांव येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालय,खानगावच्या इमारत नूतनीकरनाचा लोकार्पण समारंभ… —...

खाणगांव येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालय,खानगावच्या इमारत नूतनीकरनाचा लोकार्पण समारंभ… — आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांच्या निधीतून साकारले तलाठी कार्यालय…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री.कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया यांच्या निधीतून खाणगाव येथे ग्राम महसूल अधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले होते.

          अखेर त्या ग्राम महसूल अधिकारी पूर्ण बांधकाम झाले असून दिनांक 2 एप्रिल रोजी या वास्तूचे लोकार्पण चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे शुभ हस्ते पार पडणार होते.

             मात्र ते वनविभागाच्या बैठकी करिता मुंबई येथे असल्याने त्यांच्या वतीने चिमूरचे उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांचे हस्ते आणि चिमूरचे तहसीलदार श्रीधर राजमाने यांचे प्रमुख उपस्थितीत झाला.

         यावेळी समीर उपगनलावार उ.वि.अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,श्रीमती सत्रे मॅडम, ग्राम महसूल अधिकारी खानगाव प्रसाद एस गोडघासे मंडळ अधिकारी तिडके साहेब,खानगाव येथील सरपंच अर्चना रामटेके,सावरी येथील सरपंच लोकनाथ रामटेके, उपसरपंच निखिल डोईजड,महसूल सेवक रोशन धारणे, तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी तसेच खानगाव ,सावरी, गुजगव्हान येथील नागरिक उपस्थित होते.