Home Social स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे भंडारा शहरातील असंख्य नागरिकांनी घेतले दर्शन…

स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे भंडारा शहरातील असंख्य नागरिकांनी घेतले दर्शन…

निलय झोडे 

 उपसंपादक 

दखल न्यूज भारत

        आज भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे लाडके प्रशासनावर जबर पकड असलेले व लोकप्रिय जननेते माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या बारामतीहून आणलेल्या अस्थिकलशाचे अंतिम दर्शन घेण्याकरीता, त्यांच्या पावन स्मृतिंना उजाळा देण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी साश्रू नयनांनी श्रध्दांजली दिली.

         स्व. अजितदादा पवार यांचे अस्थी कलश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालय, भंडारा येथे सकाळी ११.०० वाजता पासून दर्शनाकरीता ठेवण्यात आले. दादाचे सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक, शेतकरी, महिला व युवक अशा सर्व क्षेत्रातील नागरिकासोबत जिव्हाळ्याचे नाते होते. करीता संपुर्ण भंडारा जिल्हयातील सर्वपक्षीय असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

         अत्यंत शोकाकुल वातावरणात हा दर्शन सोहळा पार पडला. यावेळी गुरुदेव सेवा मंडळ गणेशपूरचे भजन सादर करण्यात आले. स्व.अजितदादा पवार यांनी भंडारा जिल्हयातील गोसे प्रकल्प, सुरेवाडा उपसा सिंचन प्रकल्प, सोंडयाटोला उपसा सिंचन, नेरला उपसा सिंचन, करचखेडा उपसा सिंचन अशा प्रकल्पांना मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला.

         याप्रसंगी त्यांच्या जिल्हयातील विकासासाठी दिलेल्या योगदानावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरीता श्री. नाना पंचबुध्दे, आमदार श्री. राजु कारेमोरे, आमदार श्री. नरेंद्र भोंडेकर, श्री. धनंजय दलाल, श्री. सुनिल फुंडे, माजी खासदार श्री. मधुकर कुकडे, माजी आमदार श्री. चरण वाघमारे, भंडारा नगर परीषद च्या नगराध्यक्ष सौ. मधुरा मदनकर, श्रीमती सरीताताई मदनकर, श्री. जीया पटेल, श्री. नरेश डहारे, श्री. आशु गोंडाणे, श्री. गोपालजी मांडवकर, अनिल गायधने, जयश्री बोरकर, श्री. देवचंद ठाकरे, श्री. शैलेश मयुर, श्री. प्रकाश मालगावे, श्री. अनिल सार्वे, कल्पना कुझेकर, श्री. अमृत बन्सोड, श्री. होमराज कापगते, श्री. धनपाल चौधरी, श्री. सुरेश धुर्वे, सौ. प्रिती जगनाडे, श्री. मधु चौधरी , श्री. महादेव मेश्राम, श्री. प्रकाश पचारे, श्री. राजु माटे, हेमंत महाकाळकर यांनी स्व. अजितदादा पवार बरोबर काम करतांनी आपआपले आठवणी व मनोगत व्यक्त केले.

         याप्रसंगी सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील नागरीक, तसेच मोठया प्रमाणात पत्रकार उपस्थित होते. सर्वानी अस्थिकलशावर पुष्प अर्पण करून सामुहीक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

          दुपारी ३.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालयातून भजन मंडळीनी गायन करीत अस्थिकलश विसर्जनाकरीता महाल मार्गे गांधी चौक ते पोस्ट ऑफीस चौक ते वैनगंगा घाट जुनापुलाजवळ वैनगंगा नदीमध्ये विधिवत पूजा अर्चना करुन अश्रुपुर्ण वातावरणात अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले.

         त्यांच्या मृतात्यास शांती मिळण्याकरीता सर्व उपस्थितांनी प्रार्थना केली व “अजितदादा अमर रहे” अशा घोषणा देण्यात आल्या.