Home Social शिक्षण परिषद व विस्तार अधिकारी (शिक्षण ) यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न…

शिक्षण परिषद व विस्तार अधिकारी (शिक्षण ) यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक 

       जि.प.शाळा येवती येथे सुलतानपूर केंद्राची शिक्षण परिषद येवती व धानोरा शिक्रा शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेमध्ये विलास बाबरे यांचा सेवापूर्ती निमित्त सपत्नीक शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

            कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी प्रसाद संपकाळ यांची उपस्थिती होती.याचबरोबर विशेष अतिथी म्हणून वैशाली महाजन,केंद्रप्रमुख अनिल कोल्हे,सुरज मंडे उपस्थित होते.

         अध्यक्षस्थानी तुषाता धवने या होत्या तर विशेष उपस्थिती केंद्र प्रमुख विलास राठोड,प्रविण मेहरे,बाळासाहेब मुंदे,अनिल कोल्हे,नितीन ठाकरे, भूषण बागडे,सरपंच पुनम वायरे व्यासपिठावर विराजमान होते.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख अविनाश आढाव यांनी केले तर सूत्रसंचालन अनघा चरडे यांनी केले.आभार प्रदर्शन दिपक धांडे यांनी केले.

        या कार्यक्रमाकरिता सुभाष गिरी,विनोद वानखडे,राजेश कडू,राजू डांगे,अविनाश राठोड, इर्शाद अहमद शेख चिनू,विजय नेमाडे,भाऊराव राठोड,विरेंद्र मोरे,राजू शिंदे,कमल पळघन,संध्या इंगोले,मेघा कराळे,सुवर्णा कडू,कुमुदिनी वावगे,वैशाली जवंजाळ,संगिता जाधव,ज्ञानदेवी गणोरकर,मेघणा काळे,राजश्री पांडे,पुष्पा गेडाम,संगिता गद्रे,विजया थोरात,स्वाती दुधे,वंदना देवघरे, शकल्पना गंगात्रे,अंजली नागपुरे, वैशाली दहीकर, वैष्णवी धुर्वे कृष्णकांत मेहरे, विष्णूभाऊ शेंडे, पंकज गुल्हाणे, गोकूल राठोड, सागर येवतीकर, नितीन उघडे, मंगेश वानरे, पंडीत मेश्राम, कल्पना उघडे, रेखा नवरंगे, उज्वला नवरंगे, सुनिता कापसे, विद्या येवतीकर, सुनंदा जुनघरे, माया राठोड, अर्चना मेश्राम, यांचेसह केंद्रातील बहुसंख्य शिक्षक व नागरिक उपस्थित होते.