सुनिल हिंगणकर
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी चिमुर तसेच जल जीवन मिशन चे महादवाडी मधील ठेकेदार यांच्या चुकीच्या कामामुळे मागील चार महिन्या पासून महादवाडी गावातील पिण्याचे पाणी (दुषित) असल्यामुळे गावाकऱ्यांची गैरसोय झाली आहे.
सदर घटने मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी यांनी चौकशी करून ठेकेदार मार्फत महादवाडी गावाला आरो प्लांट लावून गावातील लोकांना सुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करीत आहे. असे लेखी पत्र दिले परंतु काम अजूनही पूर्णत्वास आले नसल्याने दिनांक ०१/०९/२०२५ ला दिलेले पत्र आहे. आणि दिनांक ०२/०९/२०२५ रोजी समस्त विभागाचे अधिकारी गावात येऊन या आरो प्लांट करीताचे भूमिपूजन केले त्याच बरोबर ठेकेदार यांनी रेती गिट्टी मटिरिअर आणले होते.
परंतु सदर काम वीस ते पंचेवीस दिवस लोटून गेले असता कुठलाही काम केला नाही. त्यामुळे दिनांक. ०१/१०/२०२५ रोजी सरपंच यांनी मोर्चा तसेच आत्मदहन करण्याचे शासनास पत्र दिले असता सदर अधिकारी आणि ठेकेदार यांनी दिनांक २८/०९/२०२५ ला काम सुरु केले आहे.
आरो प्लांट चे काम सुरु केल्यामुळे दिनांक.०१/१०/२०२५ रोजीच्या मोर्चाला मोठ्या प्रमाणात गावकरी यांचे सोबत तहसील तथा पंचायत समिती गाठत निवेदने देण्यात आली. गावाच्या विकासासाठी कुठलेही ठोस पाऊल न उचलता आत्मदहन न करता चर्चा करीत या विषयावर चर्चा करण्यात आली.
परंतु काम न झाल्यास तीव्र मोर्चा काढून शासकीय दालनातच आत्मदहन करण्यात येणार सदर मोर्चा मध्ये कुठल्याही प्रकारे विपरीत घटना घडली तर या घटनेस सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे निवेदनातून सरपंच यांनी गावाकऱ्यांसमोर मत मांडले.
शासनानी दिलेला सदर पत्र आपल्या विरुद्ध कारवाही करण्यासाठी उपयोगी राहिल याची दक्षता घ्यावी असे सरपंच यांनी संवर्ग विकास अधिकारी यांच्या दालनात बोलले असता ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी आणि पत्रावर नेमण्यात आलेला कंत्राटदार यावेळी उपस्थित असतांना येत्या १ महिन्यात काम पूर्ण करून देण्यात येईल असे यावेळी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.



