ग्राम पंचायत नवरगाव तर्फे दिनांक1/10/2023ला एक तारीख,एक तास महा श्रमदान…

 

  भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

धानोरा तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत चारही गावात नवरगाव, राजोली, येरंडी, बुरानटोला येते गावातील रस्ते, जिल्हापरिषद ग्राम पंचायत कार्यालय परिसर, अंगणवाडी परिसरात श्रमदान करून स्वच्छता करण्यात आली.

        यात ग्राम पंचायत नवरगाव चे सरपंच, सौ रंजनाताई सिडाम , उपसरपंच कु लक्सीबाई झित्रु कोवा सचिव खुशाल नेवारे, ग्राम पंचायत मेंबर ,कपील कोवा मुन्ना गेडाम, बिसन हालामी, रोशनी कोकोडे, रेशमीला मडावी,रूपाली कोरचा, सर्व आशा वर्क, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट महिला, गावकरी, पुरुष, महिला, युवक, युवती, शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनि,सर्व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित राहून श्रमदान एक तास करून गाव सर्व स्वच्छ केले आहे.

         नियमित पंधरा दिवसातून एकदा गाव स्वच्छता करण्याचे ठरविले असून अशी शपथ गावकऱ्यांनी घेतली आहे.