शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुकांर्गत मौजा महादवाडी येथील सरपंच भोजराज कामडी यांच्या आंदोलनाच्या धसक्याने महादवाडी येथे आरोप्लांट मंजूर करण्यात आला.
महादवाडी येथे गावकऱ्यांना नळाद्वारे अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने आपल्या गावातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी तडफदार सरपंच भोजराज कामडी यांनी प्रयत्न करुन जलजिवन मिशन अंतर्गत १ करोड रुपयांचे काम मंजूर केले परंतु चार वर्षांपासून हे काम सुरू असून कामामध्ये संथपणा आणि अनियमितता दिसून आल्याने हे काम पूर्ण होवु शकले नाही परिणामी गावकऱ्यांना अशुद्ध पाणी पुरवठा होवु लागला.अशुद्ध पाण्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला.
तेव्हा सरपंचांनी ग्रा.पा.पु.वि.जि.प.चिमूर, चंद्रपूर, नागपूर येथे पत्रव्यवहार करून शुद्ध पाण्यासाठी मागणी केली परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही.
शेवटी सरपंचाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारत संबंधित विभागाला ३० आगष्ट पर्यंत आरो प्लांट मंजूर करुन शुध्द पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून न दिल्यास २ सप्टेंबरला चिमुर तहसील कार्यालयापासून तर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग चिमूरचे कार्यालयापर्यंत साडी नेसून डोक्याला बासींग बांधून घागर फोड मोर्चाचे आंदोलन करणार असा इशारा देताच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि.प. चिमूरचे अभीयंता यांनी आरोप्लांट मंजूर करून दिला आणि एक सप्टेंबरला साहित्य टाकून २ सप्टेंबरला स.१० वाजता भुमीपुजन करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
भुमी पुजन समारंभाचे वेळी सरपंच भोजराज कामडी, ग्रामपंचायत सदस्य, पाणी पुरवठा अधिकारी गावकरी उपस्थित होते.
त्यामुळे दोन सप्टेंबरचा घागर फोड मोर्चा मागे घेण्यात आला आहे. तद्वतच सरपंच भोजराज कामडी यांनी येत्या १५ दिवसांत आरो प्लांट चे काम पूर्ण करून गावकऱ्यांना शुद्ध पाणी न मिळाल्यास गावकऱ्यांची फसवणूक केली समजुन १६ सप्टेंबरला ग्रामीण पाणीपुरवठा विभाग चिमुरचे कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा सरपंच भोजराज कामडी यांनी दिला आहे.



