उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक…
संभाजी नगर खंडपीठाच्या निर्णयाला अनुसरून परभणी येथील मोंढा पोलिस स्टेशन येथे भांदवी कलम १०३ (१) अंतर्गत अखेर आरोपी पोलिस अधिकाऱ्यांच्या व पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सदर गुन्ह्याचा तपास पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे.
परंतु हा संघटित गुन्हा असल्याने सोबतच भांदवी कलम १०३(२) सुध्दा आरोपींवर लावणे आवश्यक आहे असे कायदे तज्ञ म्हणतात.
मुलगा सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणातंर्गत दिनांक १८/१२/२०२४ ला आई श्रिमती विजयाबाई व्यंकटी सुर्यवंशी यांनी परभणी येथील मोंढा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीत नमूद केले होत की,मोंढा पोलिस अधिकाऱ्यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी मुलगा सोमनाथ सुर्यवंशी याला सतत ३ दिवस मारहाण केल्यामुळे तो १५/१२/२०२४ ला पोलिस कस्टडीत (न्यायालयीन) मरण पावला आहे.
यामुळे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी श्रिमती विजयाबाई व्यंकटी सुर्यवंशी यांनी केली होती.
मात्र,श्रिमती विजयाबाई व्यंकटी सुर्यवंशी यांच्या तक्रारीनंतर मोंढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.
भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 नुसार,कलम 103 (1) खुनाच्या शिक्षेशी संबंधित आहे.यात,जो कोणी खून करतो त्याला मृत्युदंडाची किंवा जन्मठेपेची शिक्षा आणि दंड होऊ शकतो,असे नमूद केले आहे.
विस्तारित माहिती…
कलम 103 (1) – खुनाची शिक्षा..
भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम 103 (1) नुसार, जर कोणी खून करत असेल,तर त्याला मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.तसेच,त्याला दंडासही पात्र ठरवले जाईल.
कलम 103 (१) पूर्वी खुनाच्या गुन्ह्यासाठी भारतीय दंड संहितेतील (IPC) कलम 302 वापरले जात होते,परंतु आता नवीन कायद्यानुसार, खुनासाठी BNS चे कलम 103 वापरले जात आहे.
IPC आणि BNS मधील बदल…
164 वर्षांपासून अस्तित्वात असलेली IPC आता 30 जूनला बंद झाली असून,तिच्या जागी BNS लागू झाली आहे.त्यामुळे, काही कलमांमध्ये बदल झाले आहेत,तसेच काही नवीन तरतुदीही समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणातंर्गत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी नगर खंडपीठ ते सर्वोच्च न्यायालय असा न्यायालयील लढा यशस्वी लढला.यामुळेच आरोपी पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.







