रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/वर्धा
वणी :– सुशगंगा पब्लिक स्कूलने आणखी एक अभिमानास्पद कामगिरी करत ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय परिसरातील स्वच्छता, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी आदर्श वातावरण निर्मिती या निकषांवर शाळेने उल्लेखनीय प्रदर्शन करत सर्व शाळांमध्ये आघाडी घेतली.
या स्पर्धेमध्ये अनेक नामांकित शाळांनी भाग घेतला होता. परीक्षकांनी स्वच्छता, टिकावूपणा, हिरवाई आणि विद्यार्थी अनुकूल सुविधा या आधारावर मूल्यांकन केले. सुशगंगा पब्लिक स्कूलने उत्कृष्टता सिद्ध करत प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला.
शाळेच्या या यशाबद्दल अध्यक्ष प्रदीपजी बोनगीरवार आणि प्राचार्य प्रविण दुबे यांनी संपूर्ण शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
प्राचार्य प्रविण दुबे म्हणाले,“हा सन्मान म्हणजे आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ आहे. स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि विद्यार्थ्यांसाठी अनुकूल शिक्षणसंस्था निर्माण करण्यासाठी आमचा कटिबद्ध प्रयत्न सुरूच राहील. शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळेच हे यश शक्य झाले आहे.”
सुशगंगा पब्लिक स्कूलने हा बहुमान मिळवल्यामुळे शाळेच्या लौकिकात भर पडली असून,भविष्यातही अशीच गुणवत्ता कायम ठेवण्याचा संकल्प शाळेने केला आहे.
सुशगंगा पब्लिक स्कूलच्या या उल्लेखनीय यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा!



