जन्म आणि मृत्युच्या दरम्यानचा काळ म्हणजे जीवन किंवा आयुष्य. हे आयुष्य सर्व सजीवसृष्टीला निसर्गाने प्रदान केले आहे.यामध्ये वनस्पती आणि प्राणी एवढाच काय तो मुलभूत फरक तो आहे.
ज्याप्रमाणे छोटी छोटी झाडे अल्पायुषी आणि मोठी मोठी वृक्ष शेकडो हजारो वर्षे जिवंत असणारी सुद्धा वनस्पती ( पिंपळ, वटवृक्ष इ. ) या निसर्गात आहेत.अगदी त्याचप्रमाणे प्राण्यात सुद्धा हा मूलभूत फरक आहे.अल्पायुषी कीटक आणि प्रदीर्घ आयुषी लाभलेले प्राणी.विशेषतः मनुष्याला तर इतर सर्व प्राण्यापेक्षा मेंदू सोबतच हृदयातून,”सदसद्विवेक ” बुद्धी विकसित करण्याची दुर्मिळ संधी उपलब्ध करून दिली ( जो चालू शकतो,बोलू शकतो,विचार करू शकतो,निसर्गातील विविध घडामोडीचे अध्ययन करून त्यांच्या कारणांना,परिणामांना शोधून त्याप्रमाणे स्वतःसोबत संपूर्ण सजीवसृष्टीचा विकास करू शकतो ) जेणेकरून त्याआधारे त्याने स्वतसोबतच इतर संपूर्ण सजीवसृष्टीचे संगोपन करावे.आणि नैसर्गिक नियमांना अविष्कारीत करून त्यानुसार एकप्रकारे निसर्गाला मदत करावी.यासाठीच कदाचित…..
माणूस आणि इतर सजीव सृष्टीत निसर्गाने हा मूलभूत फरक तर केला नसेल ना?
कदाचित….
म्हणूनच तर असे घडले नसेल ना……..
की,या निसर्गात हजारो वर्षाचे आयुष्य लाभलेल्या लाभलेल्या वटवृक्ष आणि पिंपळ ( बोधी वृक्ष) या दोन्ही वृक्षाच्या सानिध्यात आल्यामुळेच सिद्धार्थ गौतमाला निसर्गाला ओळखता आले.!
आणि त्या निसर्गनियमानुसारच मानवी कल्याणासाठी आपल्या धम्माचे संशोधन करून आचरण्यास महाकाठीण पण अशक्य नसलेला,”धम्म,त्यांनी आपल्याला दिला…..
जो धम्म निसर्गनियमानुसार खऱ्या स्वातंत्र्य,समता न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांचा अविष्कार करतो.
म्हणूनच कदाचित भन्ते आनंदाला तथागत जंगलातून जात असताना झाडाखालची पडलेली पाने उचलतात आणि आनंदाच्या हातात देऊन विचारतात की आनंदा हे मोज बरं.त्यावर आनंदा उत्तरतात की तथागता ही सात पाने आहेत. त्यावर तथागत आकाशात दूर नजर टाकून बोलू लागतात…..
“आनंदा,या पृथ्वीतलावर जेवढी वृक्ष आहेत.त्या वृक्षाना जेवढी पाने आहेत.तेवढा हा असा अगाध धम्म आहे.परंतु , यापैकी मी तुम्हांला मी केवळ सातच पाने देऊ शकतो.”
आणि या सात पानांपैकी केवळ एका पानाचा छोटासा तुकडाच आम्हाला आज 2025 च्या काळापर्यंत पोहोचून सापडला आहे.
कल्पना करा की,ती सात पाने आमच्यापर्यंत पोहोचली असती तर…
त्यानंतर संपूर्ण पृथतलावरील सर्व वृक्षाची पाने पोहोचली असती तर…
हे होऊ नये,हे झालेच नाही पाहिजे,हे होत असले तर हे होऊ द्यायचेच नाही.यासाठीच या बाहेरून आलेल्या आर्यानी अर्थात ब्राह्मणी वृतीने तथागत भगवान बुद्धाच्या धम्माला संपविण्यासाठी सर्व काही केले!
म्हणूनच पहिला घाला घातला तो पहिल्याच धम्मसंगितीत महायान/हिनयानाची निर्मिती करून. त्यानंतर त्रिपिटकात जातक ( काल्पनिक कथांची भर घालून ज्या सत्यापासून कोसोमैल दूर असतात ) घुसवून वैज्ञानिक दृष्टीकोनाला काळिमा फासण्याचे काम केले.
म्हणूनच कदाचित आज 2025 च्या काळात देशात आणि जगात एकही भन्ते ” अरंहन्तप्राप्त ” नाहीत. जे तथागतांच्या काळात 99% टक्के होते!
कारण हा परिणाम सुद्धा येथील निसर्गनियम विरोधी,संविधान विरोधी शक्तीचा अर्थात RSS मनुवादी,विचारसरणीचाच आहे.
म्हणून आम्ही ( मी अनंत भवरे ) कितीही स्वतःला संविधानवादी,निसर्गनियमवादी, विवेकवादी,विज्ञानवादी, मानवतावादी,संविधान वादी समजत असलो तरी त्याच्या जवळ सुद्धा आम्ही फिरकू शकलो नाही.हे वास्तव आम्हाला मान्यच करावं लागेल!
कदाचित आम्ही भौतिक सुखाचे भलेही कुबेर असू ,घरात,आमच्या बंगल्यात, मोठे ग्रंथालय सुद्धा असेल,परंतु ,जर आम्ही धम्माच्या पाच शीलापैकी शेवटच्या शिलाचे अर्थात……
सुरा मेरय मज्ज पमादठाणा वेरमणी,सिखापदं समादियामी.
म्हणजे कोणत्याही मादक पदार्थाचे मी सेवन करणार नाही.
ही प्रतिज्ञा जरी आम्ही जीवनभर पाळली तरी,तरी आम्ही माणूस म्हणून सिद्ध होऊ शकतो…
आणि हे होऊ नये म्हणूनच RSS ने संविधानविरोधी शक्तीने अल्कोहोलचा महापूर देशात व राज्यात निर्माण करण्याचा विडा उचललेला आहे.जेणेकरून हा देश माणसांचा होऊ नये तर हा देश निसर्ग नियमांना छेद देणाऱ्या मानसिक गुलामांचा झाला पाहिजे.यासाठीच या मनुवादी RSS चा जन्म झालेला आहे.
मी त्यांना यशस्वी होऊ देणार नाही.
तुम्ही?
हेच स्वतःला ओळखणे म्हणजे जीवन…



