स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा…

   चेतक हत्तिमारे

जिल्हा प्रतिनिधी भंडारा

           लक्ष्मी शिक्षण संस्था व क्रीडा मंडळ केसलवाडा/वाघ द्वारा संचालित स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.

           मतदार जनजागृती अभियान अंतर्गत मतदानावर आधारीत रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक – ईशा घोडाम, द्वितीय क्रमांक – तृप्ती मारवाडे तृतीय क्रमांक- प्रियंका पंधरे व प्रोत्साहनपर बक्षिस दिव्या कठाणे यांना देण्यात आला.

            कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. विशाल गजभिये यांनी केले. या कार्यक्रमातील रांगोळी स्पर्धेचे परीक्षणअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भेदराज ढवळे, गृह-अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.अर्चना निखाडे, प्रा.स्नेहा शामकुवर यांनी केले .या कार्यक्रमासाठी लिपीक खेमराज वाघाये,अजय मेश्राम,श्रीकांत धुर्वे,ग्रंथालय परिचर गितेश्वरी तरोणे,शिपाई किशोरी ननोरे,अमर जांभुळकर,तेजेंद्र सदावर्ती,शोएब शेख इत्यादींचे सहकार्य लाभले.