पारशिवनी शिवसेना (उ बा ठा ) तर्फे धाड़से सभागृह पारशिवनी येथे हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशीवणी

पारशिवनी :- दरवर्षी येणारा मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी आनंदाची पर्वणीच असते. नटून थठुन शृंगार लेवून महिला हा सण अति उत्साहाने साजरा करतात. एकप्रकारे त्यांच्या आनंदाला उधाण आले असते.त्यातून महिला शक्तीचा जागर होत असतो.

              संपूर्ण नारी शक्तीचा सन्मान व्हावा याच शुभ उद्देशाने सोमवार दिनांक 2/02/024 ला पारशिवनी शहरातील धाड़से सभागृह येथे सौ. नेहा विशाल बरबटे व समस्त महीला मित्र महीला बचत परिवारां कडून हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

                अतिशय आनंदात व थाटात पार पडलेल्या या कार्यक्रमात पारशिवनी शहर व जवळपासचे गावातील सौ. सुनिता हारोजे, दुर्गाताई कोचे विधानसभा संघटिका, वैशाली खंडार, लक्ष्मी मोकरकर , साधना डडरेमल, कल्पनाताई मस्के,जयश्री मस्के, रोशनी लोणारे,करिश्मा धोटे, एश्वर्या बांगरे ग्राम पंचायत सदस्या, संगिता लकडकर, निता गोमकाळे, निता ईटनकर, कल्याणी लाजेवार, प्राणीता वाघमारे बर्षा बोरकर माजी सरपंचा , संध्या चौधरी माजी सरपंचा प्रामुख्याने येथील अनेक महिलांनी उत्स्फुरतेने सहभाग घेतला.

             कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि कार्यक्रमाला यशस्वी करण्यात ज्या ज्या महिला-भगिनींनी हातभार लावला त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार विशाल व सौ.नेहा विशाल बरबटे व समस्त माहिला मित्र हल्दी उत्सव समिती तर्फे करण्यात आले.