अबोदनागो एस.चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती..
दखल न्युज भारत…
अमरावती :- भातकुली परिसरातील बँक शाखेतून काढलेल्या रोख रकमेची चोरी झाल्याची घटना समोर आली.बॅंकेतून रक्कम काढल्यानंतर टेलर्सच्या दुकानासमोर गाडी उभी ठेवणे चांगलेच माहागात पडले असल्याची धक्कादायक घटना घडली.
पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे कलम 303 (2) व 379 आयपीसी अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
फिर्यादी मनोज सुखदेवराव गोरटे (वय 37, व्यवसाय शेती, रा.अमरावती यांनी दिलेल्या माहितीनुसार,त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र,भातकुली शाखेतून 50,000 रुपये चेकद्वारे काढले. ही रक्कम पिशवीत ठेवून ती पिशवी मोटरसायकलच्या हँडला लटकवली होती.
फिर्यादी वाल्मिक चौक पुलाजवळील सागर टेलर्स दुकानासमोर गेले आणि त्यांची मोटरसायकल तेथे उभी केली असता,दोन अनोळखी व्यक्तींनी मोटरसायकलवरून पिशवी चोरी करून पळ काढला.
तेव्हा फिर्यादीला त्यांच्या रुपयांच्या चोरीबाबत दुकानासमोर असलेल्या लोकांनी सांगितले.फिर्यादीनी बघितले असता फिर्यादीच्या निरीक्षणानुसार संशयित व्यक्तींचा तपशील एक मोटरसायकल चालक,निळसर शर्ट,कारळसर पॅंट,तोंडावर दुपट्टा,वय अंदाजे 30–35 वर्षे व दुसरा व्यक्ती,पांढरा शर्ट,भुरकट रंगाचा पॅंट,चेह-यावर पांढरा दुपट्टा,वय अंदाजे 30–35 वर्षे असा होता.
चोरांनी पिशवीत ठेवलेले रोख,म्हणजे 500 रुपयांच्या 90 नोटा (45,000 रुपये) आणि 100 रुपयांच्या 100 नोटा (10,000 रुपये) असा एकूण 55,हजार रुपयांवर चोरांनी डल्ला मारला.
तसेच,त्यातील काही कागदपत्रेही चोरीला गेली.फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भातकुली यकलम ३०३ (२) आयपीसी कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


